स्टोरी

कलंबिस्त ते शिराशिंगे रस्ता डांबरीकरण करण्यासाठी ग्रामस्थांचे बांधकाम कार्यकारी अभियंत्यांना निवेदन…!

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त ते शिराशिंगे पर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. तो खडी करून डांबरीकरण करण्यात यावा. अशी मागणी कलंबिस्त ग्रामस्थांच्या वतीने व भाजप तर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र केणी यांच्याकडे निवेदन द्वारे केली आहे.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक रवींद्र मडगावकर, माजी सरपंच बाळू सावंत, अंतोन रॉड्रिक्स, संदेश बिडये, शरद पास्ते उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने अनिल सावंत, रमेश सावंत, प्रकाश सावंत, आदींच्या सहींचे निवेदन आहे. त्यामध्ये हा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. येत्या २६ जानेवारी पर्यंत हा रस्ता डांबरीकरण न केल्यास आंदोलन करण्यात येईल. असे निवेदनात म्हटले आहे.


Spread the love

Related posts

गंभीर आजाराने ग्रस्त कु.सुचिता बागवे हिला प्राथमिक शिक्षक भारती मालवणच्या वतीने आर्थिक मदत

news

कारिवडे गावची ग्राम ग्रामदैवत श्रीदेवी कालिका पंचायतन वार्षिक जत्रोत्सव १७ डिसेंबर रोजी संपन्न होणार.

news

मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे दुःखद निधन

news

Leave a Comment