स्टोरी

मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे दुःखद निधन

Spread the love

मुंबई: मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे रात्री २ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. महाडेश्वर यांनी ६३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.महाडेश्वरांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी सांताकृझ पूर्व, पटेल नगर सर्विस रोड इथल्या राजे संभाजी विद्यालयात दुपारी २ वाजता ठेवण्यात येईल. गेल्या चार पाच दिवसांपासून महाडेश्वर यांची तब्येत बरी नव्हती. दोन दिवसांपूर्वी सिंधुदुर्गातील कणकवली गावाहून मुबंईत आले होते. दुपारी 4 वाजता त्यांची अंत्ययात्रा टीचर्स कॉलनी इथल्या स्मशानभूमीच्या दिशेने निघेल. 2017 ते 2019 दरम्यान विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुंबईचं महापौरपद भूषवलं होते. विश्वनाथ महाडिक यांचा लग्नाच्या वाढदिवशीच निधन झाले. विश्वनाथ महाडेश्वर यांनी शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले होते. तसेच ते स्थायी समितीचे सदस्य होते.

२०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव झाला होता. शिवसेनेच्या माजी आमदार तृप्ती सावंत यांची बंडखोरी त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरल्या होत्या.


Spread the love

Related posts

केर, मोर्ले परिसरात दाखल झालेल्या हत्तींना जंगलात हाकलवण्यासाठी पश्चिम बंगाल येथून हाकारी पथक येणार….

news

हडी जठारवाडा शाळेचा शतक महोत्सव ९ मे रोजी!

news

माजी पंचायत समिती सदस्य श्री संदिपजी गावडे यांच्या हस्ते मळगाव हायस्कूल येथे वह्या वाटप!

news

Leave a Comment