स्टोरी

काँग्रेसला मत म्हणजे पाकिस्तानला मत….! आमदार नितेश राणे

Spread the love

कणकवली: कर्नाटकात काँग्रेसला मतदान झालं तिथे हिंदुत्ववादी समाजाची काय अवस्था झाली. त्या निकालातून स्पष्ट झालंय. जनतेला कळलेलं आहे, काँग्रेसला मत म्हणजे पाकिस्तानला मत, काँग्रेसला मत म्हणजे जिहाद्यांना मत, हे सरळ स्पष्ट झालेल आहे. त्यामुळे आपल्या देशात हिंदुत्ववादी विचारच देशाला तारू शकतो, असा स्पष्ट संदेश जनतेने भारतीय जनता पार्टीचा राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश विजय करून दिला आहे. असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले.

 

राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपा पक्षाचे उमेदवार विजयी झाले. याच पार्श्वभूमीवर कणकवली येथे भाजपचे आमदार नितेश राणे व माजी आमदार प्रमोद जठार यांच्यासह भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून एकमेकांना गोड मिठाई भरवत जल्लोष साजरा केला. आमदार नितेश राणे म्हणाले की, जो “हिन्दू” हित की बात करेगा वही देश पर राज करेगा! असा संदेश राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश या राज्यांनी निवडणुकीच्या माध्यमातून दिलेला आहे. याबरोबरच तेलंगणामध्ये ५ वर्षे भाजपचा १ आमदार होता त्या ठिकाणी आजच्या निकालामध्ये एकूण ९ आमदार भाजपचे विजयी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विचार, आपल्या देशात एकच गॅरंटी चालते ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. हे या निकालावरून सरळ स्पष्ट झालेले आहे. त्याबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सत्तेत असलेले सगळेच प्रमुख नेते यांनी राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश मध्ये फिरून प्रचार केला, त्यामुळे हे घवघवीत यश भाजपला आले आहे.


Spread the love

Related posts

अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री दत्त जयंती सोहळा…!

news

हडपीड स्वामी समर्थ मठ येथे २३ मार्च रोजी साडेतीन शक्तीपीठ दर्शन सोहळा! प.पु. जगतगुरु शंकराचार्य करवीर पीठ, कोल्हापूर यांची प्रमुख उपस्थिती.

news

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पर्यटकांचे आकर्षण….!

news

Leave a Comment