स्टोरी

अयोध्या येथील ५ एकर भूमी मुसलमानांच्या मशिदीसाठी देण्याचा निर्णय दुर्दैवी !

Spread the love

अयोध्या: अयोध्येतील, म्हणजेच श्रीरामाच्या भूमीतील ५ एकर भूमी मशीद बांधण्यासाठी मुसलमानांना देण्याचा निर्णय हा दुर्दैवी, तसेच मन अन् बुद्धी यांना न पटणारा आहे. हा निर्णय घेतल्याने थाटामाटात केलेल्या श्रीराममंदिराच्या उद्घाटनाला ‘शून्य’ अर्थ प्राप्त होणार आहे. मशीद बांधण्यासाठी मुसलमानांना भूमी द्यायचीच कशाला ? या निर्णयामुळे आम्हाला दुःख झाले असून अयोध्या येथील ५ एकर भूमी देण्याचा निर्णय रहित करावा, त्या भूमीवर मशीद बांधली जाऊ नये, अशीच हिंदूंची मागणी आहे, असे वक्तव्य श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी येथे केले.

 

नवरात्रोत्सवानिमित्त १६ ऑक्टोबरपासून चालू झालेल्या श्री दुर्गामाता दौडीचा सांगता समारंभ २४ ऑक्टोबर या दिवशी सकाळी १०.३० वाजता येथील शिवाजी पुतळ्यासमोर भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात पार पडला. या वेळी धारकर्‍यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी पुढे म्हणाले की,

 

१. ‘अयोध्या येथे ५ एकर भूमीत जगातील सर्वांत मोठी मशीद बांधण्यात येणार असून त्यासाठी तेथे महाराष्ट्रातील वीट देण्यात येईल’, असे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी सांगितले आहे. मग हिंदूंनो, या मशिदीसाठी महाराष्ट्रातून वीट जाऊ देणार का ? असे कदापि होता कामा नये.

 

२. आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जिवंत असते, तर अयोध्या येथे मशीद बांधण्याच्या निर्णयाच्या विरोधात ते सुडाने पेटून उठले असते. ते आता नसल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले हेवेदावे विसरून हिंदु धर्मरक्षणार्थ कार्य केले पाहिजे.

 

३. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये धर्म, परंपरा आणि संस्कृती यांच्या प्रती जी आस्था होती, ती हिंदूंमध्ये नाही. अशी आस्था हिंदूंमध्ये निर्माण झाली पाहिजे.

 

४. श्रीकृष्ण आणि पांडव यांनी कौरवांना संपवण्याची शपथ घेतली होती, तसेच सध्या इस्रायलने हमासला संपवण्याची शपथ घेतली आहे. यातून हिंदूंनी बोध घेऊन राष्ट्र आणि धर्म रक्षणार्थ कार्य केले पाहिजे.


Spread the love

Related posts

आजगाव – धाकोरे गावात मायनिंग सुरू करण्याबाबत हालचाली सुरू,ग्रामस्थांचा जोरदार विरोध…!

news

नाशिक मध्ये झालेल्या गारपिटीने शेतकरी हैराण

news

डॉ. कुरुलकर यांनी भ्रमणभाषमधील संभाषण आणि अ‍ॅप काढून टाकल्‍याचा अहवाल प्राप्‍त !

news

Leave a Comment