क्राईम

पंजाब पोलिसांना हवा असलेला आरोपी दाबोली (गोवा) पोलीस ठाण्यातून पसार.

Spread the love

गोवा: शस्त्रास्त्र कायद्याखाली पंजाब पोलिसांना हवा असलेल्या कश्मिर सिंग या आरोपीने दाबोली विमानतळ पोलीस ठाण्यातून पलायन केले आहे. या प्रकरणी ठाण्यातील २ हवालदारांना निलंबित करण्यात आले आहे.यासंबंधी पोलीस उपअधीक्षक सलीम शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार कश्मीर सिंग हा दाबोली विमानतळावरून गोवा ते दुबई विमानात चढण्याचा प्रयत्न करत असतांना त्याला केंद्रीय औद्योगिक सुरक्षादलाच्या (‘सेंट्रल इंडस्ट्रीयल सेक्युरिटी फोर्स’च्या) पोलिसांनी कह्यात घेतले आणि दाबोली पोलीस ठाण्यातील पोलिसांकडे सुपुर्द केले. हा आरोपी दाबोली येथील पोलीस कोठडीत असतांना स्वतःला बरे वाटत नाही, असे सांगून दोन वेळा स्वच्छतागृहात गेला. तिसर्‍या वेळी ‘स्वच्छतागृहात जातो’, असे सांगून त्याने तिथे असलेल्या १० फूट उंचीच्या भिंतीवरून उडी मारून पलायन केले.


Spread the love

Related posts

पुर्ववैमनस्यातून कल्याण पूर्वेत युवकाची हत्त्या, ओरोपी पोलिसांच्या ताब्यात!

news

पुलवामामध्‍ये मोठे आतंकवादी आक्रमण टळले! मोठा शस्‍त्रसाठा जप्‍त….

news

सावंतवाडी नगरपरिषदेत खळबळ: पाणीपुरवठा विभागातील महत्त्वाची रजिस्टर्स गहाळ: कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

newss

Leave a Comment