स्टोरी

छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे येत्या १६ नोव्हेंबर भारतात आणणार! सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

Spread the love

१० सप्टेंबर वार्ता: मोगल सरदार अफजल खानाचा कोथळा काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे येत्या १६ नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये आणण्यात येणार आहेत. राज्याचे वन तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात माहिती दिली. सध्या ही वाघनखे लंडनमधील व्हिक्टोरिया अ‍ॅण्ड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आलीआहेत. आता हि वाघनखे महाराष्ट्रात परत आणण्यासाठी इंग्लंडसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. संग्रहालयाने या करारात काही अटी सुद्धा समाविष्ट केल्या आहेत. संबंधित वाघनखे कुठेही फिरवता येणार नाहीत. ती संग्रहालयात एकाच ठिकाणी ठेवण्यात यावीत. त्याचा विमा काढण्यात यावा, जेणेकरून चोरी होणार नाही. आदींचा यामध्ये समावेश आहे. याशिवाय वाघनखांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना सुद्धा करारात समाविष्ट कराव्या लागणार आहेत. देशाची आणि महाराष्ट्राची अस्मिता असणारी छत्रपती शिवाजी महाराजांची ही वाघनखे महाराष्ट्रात परत आणण्यात येणार असल्याचा सर्वांनाच आनंद आहे. राज्यात आणल्यानंतर ती सर्वांना पाहण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येईल. ती ठेवण्यात येणार्‍या ठिकाणी अफजलखानाच्या वधाचा प्रसंग उभारण्यात येईल, असेही मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.


Spread the love

Related posts

सावंतवाडीतील राजवाड्यात ‘रणझुंजार ताराराणी साहेब’ या शिव व्याख्यानाचे आयोजन.

news

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सावंतवाडीत योगा व प्राणायाम मार्गदर्शन उपक्रमाचे आयोजन.

news

सुंदरवाडीवर अवधूतचा स्वरवर्षाव…!

news

Leave a Comment