स्टोरी

भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुल येथे कृष्ण जन्माष्टमी!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी 

 

भरतगड इंग्लिश मिडियम स्कूल मसुरे या प्रशालेत कृष्ण जन्माष्टमी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नर्सरी ,ज्युनिअर ,सीनियर तसेच इयत्ता पहिली ते चौथी या विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी या विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून उभारण्यात आलेला कृष्ण जन्माष्टमीनिमित्त पारंपारिक देखावा कार्यक्रमाचे आकर्षण ठरला. तसेच याप्रसंगी दहीहंडी उभारण्यात आली होती.

मुलांनी दहीहंडी फोडून कार्यक्रमाचा उत्साह आणखी द्विगुणीत केला. याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक किशोर देऊलकर शिक्षिका पार्वती कोदे, गौतमी प्रभुगावकर, संजना प्रभुगावकर,सायली म्हाडगुत, संतोषी मांजरेकर ,समीर गोसावी ,स्वरांजली ठाकूर,रसिका मेस्त्री,तनुश्री नाबर, सविता मेस्त्री ,रेश्मा बोरकर तसेच कर्मचारी वसंत प्रभुगावकर, समीर सावंत,संतोष परब राघोजी परब,करुणा चव्हाण,प्रिया पाटकर यासर्वांनी मेहनत घेतली. कार्यक्रम प्रसंगी बहुसंख्येने पालक उपस्थित होते


Spread the love

Related posts

करौली बाबा यांच्या आश्रमातच मिळतात सर्व सुविधा! एटीएम मशीनपासून ते कँटिन, आईसक्रीम पार्लर, हॉटेल आणि फ्लाईट बुकिंग करण्याचे काऊंटरही आश्रमात उपलब्ध.

news

डॉ. प्रविणकुमार ठाकरे यांना मातृशोक.

news

यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न, जिद्द व चिकाटी गरजेची..! प्रा. रुपेश पाटील

news

Leave a Comment