शिक्षण

विज्ञान मेळाव्यामध्ये मुणगे हायस्कूलचे यश!

Spread the love

 

 

मसुरे प्रतिनिधी:

 

देवगड तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात मुणगे येथील श्री भगवती हायस्कूलने तृतीय क्रमांक मिळविला. तालुकास्तरीय विज्ञान मेळावा माध्यमिक विद्यालय जामसंडे येथे नुकताच झाला. यामध्ये तालुक्यातील चौदा शाळांनी सहभाग घेतला. त्यामधून मुणगे श्री भगवती हायस्कूलच्या वतीने भरड धान्य पौष्टिक आहार की आहार भ्रम या विषयावर दहावीची विद्यार्थिनी दीक्षा रवींद्र मुणगेकर हिने सादरीकरण केले. यामध्ये तिने तृतीय क्रमांक पटकावला. तिला विज्ञान शिक्षक प्रसाद बागवे यांचे मार्गदर्शन लाभले. दीक्षा हिच्या यशा बद्दल अभिनंदन होत आहे.


Spread the love

Related posts

सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व जि. प. शाळा दि. १५ जून रोजी सुरु होणार! महेश धोत्रे….

news

डॉ. राम मेस्त्री देवरुख कॉलेजचे भूषण..! प्राचार्य नरेंद्र तेंडोलकर यांचे प्रतिपादन.

news

श्री गोपाळ गवस अखिल भारतीय बार कौन्सिलद्वारे आयोजित परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण

newss

Leave a Comment