राजकारण

राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल!

Spread the love

२५ ऑगस्ट वार्ता: राहुल गांधी लडाख दौऱ्यावर आहेत. आज अखेरच्या दिवशी राहुल गांधी यांनी कारगिलमध्ये एका सभेला संबोधित केले. यावेळी हिंदुस्थान-चीन सीमाभागात असणाऱ्या तणावावरही भाष्य केले. चीनने हिंदुस्थानची हजारो किलोमीटर जमीन बळकावली आहे. लडाखच्या लोकांनाही वास्तव माहिती आहे. त्यामुळे मोदींचा एक इंचही जमीन चीनने बळकावली नसल्याचा दावा खोटा असल्याचे राहुल गांधी म्हणाले. तसेच भारतीय जनता पक्षाला लडाखच्या लोकांची जमीन बळकावून अदानींच्या घशात घालायची आहे, असा आरोप काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी भाजपा वर केला आहे. लडाख दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी कारगिलमध्ये सभेत बोलतांना त्यांनी हे विधान केले.

लडाखच्या लोकांना प्रतिनिधीत्व दिले तर ते तुमची जमीन बळकावू शकत नाहीत हे भाजपला चांगले ठावूक आहे. भाजपला लडाखची जमीन बळकावून अदानींच्या घशात घालायची आहे. अदानींना इथे कारखाना टाकायचा आहे. मात्र त्यांना याचा फायदा लडाखच्या लोकांना होऊ द्यायचा नाहीय. मात्र आम्ही असे होऊ देणार नाही, असा एल्गार राहुल गांधी यांनी केला. चीनने हिंदुस्थानच्या हजारो किलोमीटर जमिनीवर कब्जा केला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटे बोलत आहेत. चीनने एक इंच जमिनीवरही कब्जा केला नसल्याचा मोदींचा दावा खोटा आहे, असंही राहुल गांधी म्हणाले.


Spread the love

Related posts

औरंगजेबच्या कबरीवर फुलं वाहणाऱ्यांनी या सरकारव टीका करू नये…. विखे पाटील

news

आशिष देशमुख यांचा भाजपमध्ये प्रवेश!

news

ब्रेकिंग न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दोघांमध्ये बैठक

news

Leave a Comment