राजकारण

शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल!

Spread the love

१७ ऑगस्ट वार्ता: आज बीडमध्ये झालेल्या सभेत शरद पवार यांनी बोलतांना सध्या देशात बसलेल्या सरकारला जनतेच्या प्रश्नांशी काही घेणंदेणं नाही. सध्याच्या घडीला न परवडणारी स्थिती ही शेतीची झाली आहे. कष्टकरी, मजूर, कामगार हा सगळा वर्ग अडचणीत आहे आणि या सरकारला त्याविषयीची चिंता नाही असं म्हणत शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली.

कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे जबाबदारी केंद्र सरकारची असते. आज मणिपूरची अवस्था काय आहे? मणिपूर, नागालँड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश ही छोटी राज्यं आहेत पण ही महत्त्वाची राज्यं आहेत. प्रत्येक राज्याच्या शेजारी पाकिस्तान तरी आहे किंवा चीन तरी आहे. या दोन्ही देशांची नजर चांगली नाही. संकट आलं तर काय होईल तिथून काय होईल यासाठी भारतीय लष्कराला सतर्क रहावं लागतं. मणिपूर हे सध्या अशांत आहे. आज मणिपूर पेटलं आहे. समाजा-समाजात भांडण झालं, अंतर पडलं. एक वर्ग विरुद्ध दुसरा वर्ग असा तिढा निर्माण झाला. तिथे हल्ले होत आहेत, उद्योग नष्ट केले जात आहेत. स्त्रियांची धिंड काढली जाते आहे. हे सगळं होत असताना देशात बसलेलं भाजपाचं सरकार कुठल्याच प्रकारची पावलं टाकत नाही, असं शरद पवार म्हणाले.

मणिपूरमधल्या भगिनींची दुर्दशा झाल्यानंतर आणि त्यांची घरदारं पेटवल्यानंतरही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथल्या समाजातल्या लोकांना दिलासा देण्यासाठी मणिपूरला जाणं आवश्यक होतं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिकडे ढुंकूनही पाहिलं नाही. असा आरोप शरद पवार यांनी केला. संसदेचं अधिवेशन सुरु झालं तेव्हा फक्त तीन मिनिटं ते मणिपूरवर ते बोलले. अविश्वास ठराव आल्यानंतर चार ते पाच मिनिटं बोलले. मात्र तिथल्या भगिनींचं दुःख हे देशाच्या पंतप्रधानांनी समजून घेतलं नाही. आज ही स्थिती अनेक ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळते. ही स्थिती बदलायची असेल तर वेगळा विचार करावा लागेल असं शरद पवार बीडमधल्या सभेत म्हणाले.


Spread the love

Related posts

चित्रा वाघ यांची नाव न घेता राऊतांवर टिका!

news

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी राहुल गांधी यांना क्षमा मागण्यास भाग पाडले पाहिजे ! – रणजीत सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान

news

“शिवसेनेचा सौदा करायचा हे दिल्लीने आधीच ठरवलं होतं, त्यामध्ये निवडणूक आयोगाने….” संजय राऊत यांचा घणाघात..

news

Leave a Comment