क्राईम

पोलिसांवर आक्रमण करणार्‍या टोळक्‍यास १६ वर्षांनंतर शिक्षा !

Spread the love

नाशिक: शहराच्‍या मध्‍यवस्‍तीत दगडफेक करत दहशत निर्माण करणार्‍या, तसेच पोलिसांवर आक्रमण करणार्‍या चौघांना जिल्‍हा आणि सत्र न्‍यायाधीश मलकापट्टे रेड्डी यांनी प्रत्‍येकी ३ वर्षे सक्‍तमजुरी आणि २० सहस्र रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. घटनेच्‍या तब्‍बल १६ वर्षांनंतर न्‍यायालयाने आरोपींना शिक्षा ठोठावली आहे. गणेश घोडके, दीपक अहिरे, उमेश ठोके आणि किरण नागरे अशी आरोपींची नावे आहेत.

२६ फेब्रुवारी २००७ या दिवशी सायंकाळच्‍या सुमारास सी.बी.एस्. येथील पद्मा उपाहारगृहापासून प्रारंभ करत ८ जणांच्‍या टोळक्‍याने शरणपूर रस्‍त्‍यावरून टिळकवाडी परिसरात दुकानांवर दगडफेक केली. हातगाड्या उलटवत त्‍यांवरील मालाची हानी केली. हातगाडीचालकांना दमदाटी केली, तसेच रस्‍त्‍यावर दिसेल, त्‍याला शिवीगाळ आणि दमदाटी करत हातातील शस्‍त्रे फिरवत दहशत निर्माण केली. पोलिसांनी टोळक्‍यास नियंत्रणात आणण्‍याचा प्रयत्न केला; मात्र टोळक्‍याने पोलिसांवर प्राणघातक आक्रमण करत त्‍यांना सरकारी काम करण्‍यापासून परावृत्त केले. या प्रकरणी पोलिसांनी अन्‍वेषण करत न्‍यायालयात दोषारोपपत्र प्रविष्‍ट केले होते. या गुन्‍ह्यातील संशयित मुख्‍य सूत्रधार मोहन चांगले याचा मे २०१३ मध्‍ये खून झाला होता.


Spread the love

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात शिवसेनेच्या उपविभागप्रमुखाची हत्या….

news

पुणे कल्याणी नगर मधील अपघात प्रकरणातील आरोपीने ३०० शब्दाचा लिहिलेला निबंध वाचनासाठी प्रसिद्ध करा.

news

पी.एफ्.आय.च्या ५५ समर्थकांना अटक! उत्तरप्रदेशात ३० जिल्ह्यांमध्ये आतंकवादविरोधी पथकाकडून धाडी! समाजवादी पक्षाचा नेता अब्दुल खालिक याला अटक….

news

Leave a Comment