स्पोर्ट

तेजस्विनी विरेंद्र आचरेकर ह्यांची राष्ट्रिय तायक्वांडो कॅडेट स्पर्धा महाराष्ट्र संघ प्रशिक्षकपदी निवड!

Spread the love

२६ जुलै वार्ता: तायक्वॉंडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने ६ वी महाराष्ट्र राज्य कॅडेट बॉईज अँड गर्ल्स क्युरोगी आणि ६ वी पुमसे तायक्वॉंडो चॅम्पियनशिप ३० जून ते २ जुलै २०२३ रोजी मुंबई येते संपन्न झाल्या. या स्पर्धेतील सर्व सुवर्ण पदक विजेत्या स्पर्धकांची २७ ते ३० जुलै रोजी लखनऊ येते होणाऱ्या ६ वी राष्ट्रीय तायक्वॉंडो स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. तसेच या महाराष्ट्र कॅडेट गर्ल्स संघला महाराष्ट्र संघ प्रशिक्षक म्हणून लांजा तालुका सचिव व लांजा तालुका प्रमुख प्रशिक्षिका तेजस्विनी विरेंद्र आचरेकर यांची निवड करण्यात आली आहे.

त्यांच्या या यशाबद्दल तायक्वॉंडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ.अविनाश बारगजे, फेडरेशनचे सहसचिव शिवछत्रपती क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार विजेते मिलिंद पठारे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील,उपाध्यक्ष धुलीचंद मेश्राम, कोषाध्यक्ष वेंकटेश्वरराव कररा,जिल्हा सचिव लक्ष्मण कररा उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे,कोषाध्यक्ष शशांक घडशी,तायक्वॉंडो फिटनेस अकॅडमी लांजा तालुका अध्यक्ष किशोर यादव, उपाध्यक्ष अमोल रेडीज,कोषाध्यक्ष तेजस दत्ताराम पावसकर, सदस्य रोहीत कांबळे, व लांजातील पालक वर्ग खेळाडूंनी अभिनंदन केले व फुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.


Spread the love

Related posts

सावंतवाडी केंद्रस्तरीय शालेय बालकलाक्रीडा स्पर्धेचे उदघाटन मा. नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या हस्ते…!

news

राज्यस्तरीय शुटिंग बॉल स्पर्धेत सोलापूर संघ अजिंक्य..! 

news

वडाचापाट येथे ८ फेब्रुवारी पासून खुली अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा!

news

Leave a Comment