स्टोरी

शिरीष कणेकर काळाच्‍या पडद्याआड!

Spread the love

२६ जुलै वार्ता: ज्‍येष्‍ठ लेखक, पत्रकार आणि कथाकथनकार शिरीष कणेकर यांचे वयाच्‍या ८० व्‍या वर्षी निधन झाले आहे. खास शैलीतून टोकदार, तसेच उपाहासात्‍मक लिखाण करणारे शिरीष कणेकर यांचे अनेक चाहते आहेत. ते सामाजिक समस्‍यांवर विनोदी शैलीतून बोट ठेवत. चित्रपट, क्रिकेट आणि राजकारण हे त्‍यांच्‍या लिखाणाचे प्रमुख विषय होते. अत्‍यंत खुमासदार लिखाणाच्‍या पद्धतीमुळे ते प्रसिद्ध होते. जवळजवळ सर्वच प्रसिद्ध इंग्रजी आणि मराठी वृत्तपत्रे अन् नियतकालिके यांतून त्‍यांनी विपुल स्‍तंभलेखन केले. ‘लगाव बत्ती’ या कथासंग्रहाला महाराष्‍ट्र साहित्‍य परिषदेचा आणि उत्‍कृष्‍ट विनोदी वाङ्‍मयाचा ‘चिं.वि. जोशी’ पुरस्‍कारही त्‍यांना मिळाला होता.


Spread the love

Related posts

आडवली मालडी ग्रामपंचायत वेबसाईट लोकार्पण सोहळा २९ ऑगस्ट रोजी!

news

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा चराठे न १ येथे माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात साजरा.

news

कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा.

news

Leave a Comment