स्टोरी

कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी!

Spread the love

२३ जुलै वार्ता: राज्यात पुढील पाच दिवस पावसाच्या दृष्टीने चिंतेचे असणार आहेत. कारण संपूर्ण राज्यभरात मुसळधार ते मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यातील काही भागात पुरस्थिती निर्माण झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसाचा जोर अद्यापही कमी होण्याचे नाव घेत नाही. हवामान विभागाकडून राज्यातील महत्त्वाच्या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला असून काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या आठवड्याभरापासून राज्यात मुसळधार पाऊस जोरदार बरसत आहे. अशातच हवामान विभागाने कोल्हापूर, सातारा, पुणे, पालघर, ठाणे, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.


Spread the love

Related posts

उरण नगरपालिका क्षेत्रात स्वच्छता अभियानाचे आयोजन!

news

सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा सर्वांगीण परिषद मार्फत कोकणचा अभ्यास दौरा..!

news

कारागृहातील बंदीवानांना ‘श्रीमदभगवतगीता आत्मसाक्षात्काराचे विज्ञान’ या विषयावर मार्गदर्शन इस्कॉनच्या सावंतवाडी विभागाच्यावतीने आयोजन…!

news

Leave a Comment