राजकारण

अमोल मिटकरी यांच्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण!

Spread the love

२२ जुलै वार्ता: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री शिंदे काल २१ जुलै रोजी दहाच्या सुमारास मुंबईहून दिल्लीला रवाना झाले. दरम्यान एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अजित पवार यांचे कट्टर समर्थक अमोल मिटकरी यांनी अजित पवारांचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. अजित पवारांची राजकारणात काम करण्याची स्टाईल, त्यांचा स्पष्टवक्तेपणा आणि त्यांची कार्यशैली त्यातून दाखवण्यात आली आहे. या व्हिडीओला ‘मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच #अजितपर्व’ असं कॅप्शनही त्यांनी दिलं आहे. अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने खास अंदाजात अमोल मिटकरी यांनी अजित पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमोल मिटकरी यांच्या या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.


Spread the love

Related posts

जो काही गैरव्यवहार झाला आहे ‘मातोश्री’मध्ये झाला आहे! मुख्यमंत्री शिंदे.

news

राहुल नार्वेकर जो निर्णय ठरवतील तो रिजनेबल टाईम आहे! जयंत पाटील

news

माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी घेतली शरद पवार आणि जयंत पाटील यांची भेट!

news

Leave a Comment