क्राईम

जम्मू-काश्मीरमध्ये २ आतंकवादी ठार! महाराष्ट्रातील २ कामगारांवर आतंकवाद्यांकडून गोळीबार….

Spread the love

२० जुलै वार्ता: जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे नियंत्रणरेषेजवळ १९ जुलैच्या सकाळी घुसखोरी करणार्‍या २ आतंकवाद्यांना सुरक्षादलांनी ठार केले. या आतंकवाद्यांकडून ४ एके रायफली आणि ६ हँडग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत. १८ जुलै या दिवशी अनंतनाग जिल्ह्यात आतंकवाद्यांनी महाराष्ट्रातील अक्षय आणि सौरव या २ हिंदु कामगारांवर गोळीबार केला होता. यात हे कामगार घायाळ झाले होते. ते एका दागिन्याच्या दुकानात काम करतात. ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ या आतंकवादी संघटनेचे मुखपत्र असलेल्या ‘कश्मीर फाइट’ने या आक्रमणाचे दायित्व स्वीकारले आहे.


Spread the love

Related posts

मिरारोड ड्रग रॅकेटचा मोठा स्फोट! तेलंगणातील एमडी ड्रग कारखाना उद्ध्वस्त

प्रसाद परब

ग्लोबल हेल्प नावाने कंपनी सुरु करून महाराष्ट्र राज्यातील लोकांची करोडो रुपयांची फसवणूक..!

news

अतिक अहमद आणि अशरफ यांच्या हत्येबाबत विशेष अपडेट्स!

news

Leave a Comment