स्टोरी

नैऋत्य मान्सून केरळात दाखल!

Spread the love

८ जून वार्ता: नैऋत्य मान्सून केरळात दाखल झाला आहे, अशी माहिती हवामान खात्यानं दिली आहे. केरळच्या बहुतांश भागांमध्ये आज सकाळपासून पाऊस सुरू झाला आहे. मान्सूनला यंदा तब्बल सात दिवस विलंब झाला आहे. एरवी मान्सून १ जून रोजी केरळमध्ये दाखल होते. यंदा मात्र यासाठी 8 तारीख उजाडावी लागली. तळकोकणात १६ जून किंवा त्यानंतरच मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. हवामान खात्यानं गुरूवारी मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली. केरळच्या अनेक भागांमध्ये चांगला पाऊस झाला. मान्सूनच्या आगमनानं गरमीनं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. विदर्भाच्या काही जिल्ह्यात पुढच्या तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यासह यलो अलर्ट देण्यात आला आहे.


Spread the love

Related posts

मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी कणकवलीत आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत मराठा समाज बांधवांच्या वतीने कँडल मार्च….

news

सायबर गुन्ह्या बाबत जागृत रहा! पो. उपनिरीक्षक सुधीर कदम

news

राठीवडे विश्वकर्मा मंदिर येथे सांस्कृतिक सभागृह मंजूर करून मालवण तालुका सुतार समाजाची आ. वैभव नाईक यांनी केली स्वप्नपूर्ती ; विश्वकर्मा जयंतीचे औचित्य..!

news

Leave a Comment