राजकारण

स्वाभिमानी कुणाच्या दारात जाणार नाही! राजू शेट्टी

Spread the love

२६ मे वार्ता: आगामी निवडणुकीत स्वाभिमानी महाविकास आघाडी किंवा भाजपच्या नादाला लागायचे नाही. स्वाभिमानी कुणाच्या दारात जाणार नाही. तसेच महाविकास आघाडी किंवा भाजपने उमेदवार दिला नाही तर आम्हाला वावडे नाही. आतापासूनच कामाला लागा. गेल्या पराभवाचा बदला पूर्ण करायचा आहे, याला तुमची साथ हवी, असे आवाहन स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. उदगाव (ता. शिरोळ) येथील कल्पवृक्ष गार्डन येथे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यावेळी शेट्टी बोलत होते.

माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, गेल्या २० वर्षांपासून स्वाभिमानी सर्वसामान्यांच्या हितासाठी झटत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आपण केलेल्या कार्याची माहिती सर्वांना सांगायची आहे. २००९ ला ज्याप्रमाणे कार्यकर्ते सक्रिय होते, त्याचप्रमाणे आता आपण सक्रिय होण्याची गरज आहे. त्यामुळे या निवडणुकीला आत्तापासूनच तयारीला सुरुवात केली आहे.


Spread the love

Related posts

अगोदर तुम्ही पळालात, नंतर मी खिंड लढवली” विखे पाटलांना बाळासाहेब थोरात यांचं प्रत्युत्तर

news

साई रिसॉर्ट प्रकरणावरून सुषमा अंधारे यांची किरीट सोमय्या यांच्यावर टीका!

news

आम्ही सामनाच्या अग्रलेखाला महत्त्व देत नाही! शरद पवार

news

Leave a Comment