राजकारण

भाजपाने पाळलेला कोंबड्यांचा तो खुराडा आहे! संजय राऊत

Spread the love

२६ मे वार्ता: माध्यमांशी बोलताना राऊत यांनी पुन्हा एकदा मिंधे गट असा उल्लेख करत शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. मी शिंदे आणि त्यांच्यासह गेलेल्या चाळीस लोकांना पक्ष मानतच नाही असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. शिंदे गट लोकसभेच्या २२ जागा लढवणार असल्याची चर्चा आहे असं विचारलं असता संजय राऊत म्हणले की, मूळात तुम्ही जो काय शिंदे-मिंधे गट म्हणत आहात त्यांच्याकडे मी पक्ष म्हणून पाहातच नाही. भाजपाने पाळलेला कोंबड्यांचा तो खुराडा आहे. गावाला कोंबड्यांचे खुराडे असतात, कधीही कुठल्याही कोंबड्या कापल्या जातील. तो पक्ष नाहीच, कोंबड्या कॉक कॉक आरवत असतात. तसं ते करताहेत. अशी खोचक टीका संजय राऊतांनी यावेळी केली.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, पक्ष म्हणून त्यांच्याकडे काय आहे ? काय विचारधारा आहे? फक्त निवडणूक आयोगाने निर्णय विकत दिला म्हणजे पक्ष ठरत नाही. त्या टोळीने ४८ जागा लढवाव्यात आम्हाला काही फरक पडत नाही.


Spread the love

Related posts

महाविकास आघाडी चालेल आणि यापुढेही आम्ही मिळून काम करू! नाना पटोले

news

शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात २ तास चर्चा!

news

महाराष्ट्र राज्यातील राजकारणाबाबत देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट….

news

Leave a Comment