क्राईम

जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर प्राणघातक हल्ला

Spread the love

१२ मे वार्ता: जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयासमोर अज्ञातांकडून आज शुक्रवारी दि.१२ रोजी पावनेदोनच्या सुमारास प्राणघातक हल्ला झाला आहे. जखमी अवस्थेतील आवारे यांना उपचारासाठी सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आवारे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात कामानिमित्त आले होते.दरम्यान दबा धरून बसलेल्या अज्ञात शस्त्रधारी इसमांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. सदर घटनेमुळे तळेगाव दाभाडे परिसरात खळबळ उडाली असून, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


Spread the love

Related posts

विजयदुर्ग-सावंतवाडी बसने प्रवास करणाऱ्या महिलेकडील पिशवी फाडून आतील सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन चोर फरार.

news

कमी वेळात श्रीमंत होण्याच्या नादात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही व्यक्तींच्या आर्थिक समस्यांमध्ये वाढ.

news

पट्टेरी वाघाचे कातडे आणि नखांची तस्करी करणार्‍या ३ जणांना अटक

news

Leave a Comment