क्राईम

गोव्यातून गुजरातकडे होणार्‍या बेकायदा दारु वाहतुकी विरोधात बांदा पोलीसांची कारवाई

Spread the love

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: गोव्यातून गुजरातकडे होणार्‍या बेकायदा दारु वाहतुकी विरोधात बांदा पोलीसांनी मंगळवारी रात्री उशिरा कारवाई केली. या कारवाईत ११ लाख ६५ हजार ३९५ रुपयांच्या दारुसह दारु वाहतुकीसाठी वापरलेला सुमारे २० लाखांचा ट्रक असा एकूण ३१ लाख ६५ हजार ३९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी प्रदीपकुमार श्रीभगवती प्रसाद व महम्मद शबीर वहिदीभाई इंद्राशी, दोघेही रा. गुजरात यांना ताब्यात घेण्यात आले. ट्रकमध्ये चोरकप्पा तयार करुन सदर दारु वाहतूक करण्यार येत होती.

सदर कारवाई मंगळवारी इन्सुली चेकपोस्टवर करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे व उपनिरीक्षक समीर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल प्रथमेश पोवार व कॉन्स्टेबल प्रसाद पाटील यांनी कारवाई केली.


Spread the love

Related posts

गँगस्टर अतीकचा मुलगा असदचा एन्काउंटर!

news

बदलापुरातील शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेला २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी.

news

मुंबई येथे लोकल ट्रेनमध्ये २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार!

news

Leave a Comment