स्टोरी

कलंबिस्त तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सौ मीनल महादेव जंगम यांची सर्वानुमते निवड.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सौ मीनल महादेव जंगम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. कलंबिस्त दशक्रुशीतील पहिल्या महिला तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून मान मिळवला आहे. सौ मीनल जंगम या सामाजिक साहित्यिक ग्रंथ चळवळ तसेच सांस्कृतिक महिला बचत गट आधीच्या माध्यमातून त्यांनी काम केले आहे. भाजपच्या महिला आंबोली मंडल पदाधिकारी म्हणून त्यांनी गेले काही वर्ष काम केले आहे. सरपंच पदाच्या निवडणुकीत त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती भाजप पक्षातून उमेदवारी मागितली होती. परंतु त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन अपक्ष निवडणूक लढवली त्यानंतर त्यांनी गावातील सामाजिक कार्यात त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते. महिला बचत गटांची एकत्रीकरण करून या माध्यमातून महिलांना संघटित करण्याचे काम त्या करत आहेत. कलंबिस्त ज्ञानमंदिर वाचनालयाच्या त्या संचालक म्हणून कार्यरत आहेत गावाच्या विकास कामात त्यांचा नेहमीच हातभार असतो कोरोना काळात त्यांनी अनेक रुग्णांना मदतीचा हातही दिला आहे. असे त्यांचे सामाजिक राजकीय क्षेत्रात त्यांचे योगदान आहे.

या त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. कलंबिस्त ग्रामपंचायतीची ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत त्यांचे एकमताने निवड करण्यात आली. या निवडीनंतर त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.या निवडीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या माझी निवड करून संपूर्ण महिला वर्गाचा सन्मान करण्यात आला आहे. आतापर्यंत मी जे काही सामाजिक कार्य केले त्याचे हे फळ आहे. या गावातील वाद-विवाद सामोपचाराने कसे मिळता येईल त्या दृष्टीने माझे प्रयत्न राहतील तसेच गाव तंटामुक्त करण्याचा आपला मानस आहे आहे तसेच गावातील अवैद्य धंदे व्यसनमुक्त गाव एकोप्याने करण्याचा आपला मानस राहील सर्वांच्या सहकार्याने गाव एक संघ ठेवून गावाला विकासात्मक दृष्ट्या प्रगतीच्या दिशेने कसे नेता येईल यासाठी माझे प्रयत्न राहतील.असे त्यांनी स्पष्ट केले.


Spread the love

Related posts

ज्यूंनी संकल्प करून इस्रायल राष्ट्र निर्माण केले, तसे हिंदूंनीही संकल्प केला तर रामराज्य येईल..! विजय शर्मा, उपमुख्यमंत्री, छत्तीसगड.

news

मूलभूत कलागुणांचा विकासच महत्वाचा..! कवी अजय कांडर यांचे कणकवली फ्लोरेट कॉलेज इंटिरियर अँड फॅशन डिझायनिंगच्या वार्षिक स्नेहमेळाव्यात प्रतिपादन

news

माजी नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन.

प्रसाद परब

Leave a Comment