स्टोरी

अन्यायग्रस्त कुटुंबाच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना खंबीरपणे उभी! शाई, मुरबाड अन्यायग्रस्त कुटुंबाला दिला आधार

Spread the love

आज शाई येथे वनविभागाच्या कारवाईमुळे अन्याय झाल्याचा आरोप असलेल्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. या कठीण प्रसंगी त्यांना धीर देत, त्यांच्या न्यायाच्या लढ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असा विश्वास दिला.यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुरबाड तालुका अध्यक्ष सन्माननीय श्री. अरुणजी वारघडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अन्यायग्रस्त कुटुंबाची भेट घेऊन त्यांना मानसिक आधार दिला.

अन्यायाविरोधात आवाज उठवणार, कायदेशीर लढा लढणार आणि न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा करणार!

संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी आणि कुटुंबाला न्याय मिळावा, ही मनसेची ठाम भूमिका आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन व उपोषण करून न्यायासाठी संघर्ष केला जाईल असा इशारा दिला आहे..अन्यायाविरोधात संघर्ष, न्यायासाठी पाठपुरावा आणि पीडित कुटुंबाला आधार देण्याचे काम मनसे करणार. अन्यायाविरोधात शांत बसणार नाही. उलट महाराष्ट्र नवनिर्माण सेना अन्यायग्रस्तांच्या न्यायासाठी सदैव तत्पर आहे आहे आणि राहणार.


Spread the love

Related posts

निशिकांत कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई कडून साहस प्रतिष्ठान दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी १० डेक्स भेट

news

भारत-पाकिस्तान सीमेवर उभारला जाणार छत्रपती शिवरायांचा अश्‍वारूढ पुतळा !

news

झाडावर फवारणी करण्याचे औषध प्राशन केल्याने एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान झाला मृत्यू.

news

Leave a Comment