स्टोरी

श्री गणेशोत्सवासाठी चाकरमानींचे स्वागत; सावंतवाडीची आरोग्य यंत्रणा सज्ज.

Spread the love

सावंतवाडी (रवी जाधव): प्रवाशांच्या आरोग्य तपासणीसाठी वैद्यकीय मदत पथके तैनात; १० ते १३ व १६-१७ सप्टेंबरदरम्यान विशेष व्यवस्थासावंतवाडी : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे, गोवा तसेच इतर जिल्ह्यांतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या संख्येने आपले चाकरमानी व नागरिक दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, सावंतवाडीच्या वतीने आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांमार्फत हिवताप, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस तसेच इतर संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी प्रवासाच्या ठिकाणीच प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कुठे आणि कधी असणार आरोग्य पथके?ठिकाणआरोग्य पथकाची तारीखसावंतवाडी बस स्थानक१० ते १३ सप्टेंबर २०२६सावंतवाडी रेल्वे स्थानक१० ते १३ सप्टेंबर २०२६आंबोली चेक पोस्ट/तपासणी नाका १० ते १३ सप्टेंबर २०२६सावंतवाडी रेल्वे स्थानक१६ व १७ सप्टेंबर २०२६या कालावधीत येणाऱ्या प्रवाशांची प्राथमिक आरोग्य तपासणी, आजाराची लक्षणे आढळल्यास आवश्यक मार्गदर्शन व पुढील उपचारासाठी संदर्भ सेवा 108 व 102 मार्फत उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे देण्यात येणार आहे. पथकांनी केलेल्या कामाचा दैनंदिन अहवाल ऑनलाइन पद्धतीने नोंदविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सावंतवाडी बस स्थानक व रेल्वे स्थानकाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी आरोग्य विभागाने समन्वय साधून पथकांसाठी आवश्यक जागा व बैठक व्यवस्था उपलब्ध करून देण्याची कार्यवाही संमधितानी केली आहे. प्रवाशांना आरोग्य तपासणीबाबत माहिती मिळावी यासाठी ध्वनिक्षेपकाद्वारे आवाहन करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवासाठी आपल्या गावी येणाऱ्या चाकरमान्यांचे सुरक्षित आणि निरोगी स्वागत व्हावे, तसेच संसर्गजन्य आजारांचा संभाव्य धोका वेळीच ओळखता यावा, यासाठी आरोग्य विभागाकडून विशेष दक्षता घेण्यात येत आहे. डॉ. रमेश कर्तस्करतालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती सावंतवाडी असे आवाहन करण्यात येत आहे


Spread the love

Related posts

गुजरातच्या कच्छमध्ये ‘बिपरजॉय’ वादळाचा तडाखा.

news

जागतिक वसुंधरा दिनी कल्याण मधील रिंडरोड सभोवताली वृक्षांची लागवड

news

छत्रपती शिवाजी महाराज हे अजब रसायन आहेत…! सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. रुपेश पाटील

news

Leave a Comment