सावंतवाडी: अनेक राजकीय-सामाजिक जबाबदाऱ्या लीलया पेलणारे, सामान्य माणसाच्या मनात असामान्य आदरस्थान असलेले, मळगावचे सुपुत्र _सन्माननीय श्री. चंद्रकांत भोजू जाधव_ यांची मळगाव तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी निवड होणे, ही केवळ निवड नाही तर मळगावच्या न्यायप्रिय परंपरेचा सन्मान आहे.*या निवडीचे विशेष महत्त्व म्हणजे लोकसेवेचा अखंड वारसा.* मळगाव ग्रामपंचायतीची जेव्हा १९५७ साली पहिली स्थापना झाली, तेव्हा त्यांचे वडील _कै. भोजू जाधव_ यांनी मळगाव ग्रामपंचायतीचे प्रथम सन्माननीय सदस्य म्हणून अत्यंत निष्ठेने आणि उत्तम कामगिरी बजावली होती. वडिलांनी लावलेल्या सेवेच्या त्याच रोपट्याचा वटवृक्ष आज चंद्रकांत भाऊंच्या रूपाने मळगाव पाहत आहे.ज्यांच्या घरातच लोकसेवेचा वारसा आहे, भाजप जिल्हा चिटणीस. चंद्रकांत जाधव हे 4 वेळा ग्रामपंचायत सदस्य ज्यांच्या अर्धांगिनी सौ. अर्चना चंद्रकांत जाधव_ यांनी गावच्या सरपंच पदाची धुरा समर्थपणे सांभाळली, आणि ज्यांनी भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती-जमाती प्रदेश कार्यकारणी व जिल्हाध्यक्ष पदापर्यंत आपल्या कार्याचा ठसा उमटवला, अशा _समाजभूषण पुरस्काराने_ गौरविलेल्या या तपस्वी नेतृत्वाची ही निवड सर्वार्थाने सार्थ आहे.जात-पात, गरीब-श्रीमंत, लहान-थोर हा भेद न मानता, प्रत्येकाला आपलेसे करणारे हे व्यक्तिमत्व आज न्यायाच्या आसनावर बसले आहे. ही मळगावसाठीच नव्हे, तर संपूर्ण सावंतवाडी तालुक्यासाठी गौरवाची बाब आहे.त्यांच्या न्यायदानात पक्षपात नसेल, तर माणुसकी असेल. त्यांच्या हातून गावातील प्रत्येक वाद हा वाद न राहता संवाद बनेल आणि मळगाव हे महाराष्ट्रात आदर्श तंटामुक्त गाव म्हणून लौकिकास येईल, यात शंका नाही. १९५७ पासून सुरू झालेली जाधव कुटुंबाची ही सेवा-परंपरा अशीच अविरत चालू राहो!*न्यायप्रिय, कर्तव्यनिष्ठ आणि सर्वसमावेशक नेतृत्व _मा. चंद्रकांत भोजू जाधव_ यांना मानाचा मुजरा व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
