स्टोरी

श्री एकमुखी दत्त मंदिर सावंतवाडी येथे ०१ सप्टेंबर रोजी होणार श्री टेंब्ये स्वामी जयंती उत्सव.

Spread the love

सावंतवाडी (दीपक पटेकर): सावंतवाडी येथील प्रसिद्ध श्री एकमुखी दत्तमंदिर, सबनीसवाडा येथे मंगळवार दिनांक ०१ सप्टेंबर २०२६ रोजी श्री टेंब्येस्वामी महाराज जयंती उत्सव होणार असून सकाळपासून रात्रीपर्यंत विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. या कार्यक्रमाचा व स्वामी दर्शनाचा सर्व स्वामीभक्तांनी अवश्य लाभ घ्यावा व कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन श्री दत्तमंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर स्थानिक देवस्थान उपसमिती सावंतवाडी यांनी केले आहे.


यावेळी सकाळी ८.०० वाजता श्री एकमुखी दत्तपूजा, अभिषेक, एकादशनी, ९.०० वाजता श्री.सत्यदत्त पूजा, दुपारी १२.३० वाजता आरती, १.०० वा. महाप्रसाद, सायंकाळी ५.०० वाजता माऊली भजन मंडळ बावळाटच्या सौ.रक्षंदा परब आणि सहकलाकार यांचा भजनाचा कार्यक्रम, ७.०० वा.नामस्मरण व आरती, ८.०० वाजता पालखी सोहळा, ९.०० वाजता स्थानिक भजन, १०.०० वा. श्री इस्वटी भजन मंडळ सबनीसवाडा यांचा भजनाचा कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन केले आहे.


Spread the love

Related posts

कै.दिनकर गंगाराम सामंत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने मिळणार गरजू व्यक्तींना आर्थिक मदत!

news

असनिये सारख्या दुर्गम गावात आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

news

आई-बाबांच्या स्वप्नपूर्तीसाठी जीवाचं रान करा..! – प्रा. रुपेश पाटील.

news

Leave a Comment