स्टोरी

१ नोव्हेंबरपासून भ्रमणभाषवर अनोळखी क्रमांकावरून येणार्‍या संपर्काच्या वेळी संबंधिताचे नावही दिसणार !

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: अनोळखी क्रमांकावरून येणारे भ्रमणभाष संपर्क (कॉल) आता ओळखता येणार आहेत. केंद्र सरकारने बनवलेल्या या नियमानुसार येत्या १ नोव्हेंबरपासून सर्व भ्रमणभाष वापरकर्त्यांना संपर्क करणार्‍या व्यक्तीचे नाव दाखवण्याची सुविधा अनिवार्य करण्यात आली आहे.

१. या नव्या नियमानुसार भ्रमणभाषची घंटा वाजल्यावर क्रमांक आणि नाव दिसणार आहे. सरकारचा आदेश सर्व टेलिकॉम आस्थापनांना लागू करण्यात आला आहे; मात्र ही सुविधा टू जी आणि थ्री जी नेटवर्कवर उपलब्ध होणार नाही. ‘फोर जी’ आणि त्यावरच्या नेटवर्कमध्ये ही सुविधा पूर्णपणे उपलब्ध असेल.

२. नाव दिसले, तरी याचा अर्थ समोरून येणारे सर्व संपर्क सुरक्षित असतील, असे नाही. बर्‍याचदा फसवणूक करणारे नाव पालटून किंवा ओळख लपवून संपर्क करतात. त्यामुळे अनोळखी क्रमांकावरून येणार्‍या संपर्कावर बोलतांना वैयक्तिक माहिती देणे चुकीचे ठरू शकते.


Spread the love

Related posts

२६ मेपासून सुरू हाेणार समृद्धी’चा दुसरा टप्पा! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करणार लाेकार्पण

news

तंत्रस्नेही शिक्षक सतिश मुणगेकर यांची रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी निवड!

news

राजस्थानात आश्रयास आलेल्या पाकिस्तानी हिंदूंचे प्रचंड हाल!घर व पाण्याची टाकी उद्ध्वस्त, कडक उन्हात खाट हेच छत

news

Leave a Comment