स्टोरी

नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नेमळे येथे “वाचन प्रेरणा दिन” उत्साहात संपन्न.

Spread the love

सावंतवाडी (म.ल.देसाई): जीवनात आकार देण्यासाठीवाचन खूप महत्त्वाचे आहे. वाचन केल्याने मनावरही चांगले संस्कार होतात. तसेच मराठी भाषा पुढे न्यायची असेल तर वाचन महत्त्वाचे आहे, माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो कारण मुलांनी जास्तीत जास्त वाचन, लेखन, मनन व मराठी विश्वकोशाचा ही अभ्यास करावा. महत्त्वाच्या संकल्पना आपणांस मराठी भाषेतून मिळाव्यात याकरिता मराठीविश्वकोशाची सुरुवात झाली. मुलांना एखाद्या विषयाबद्दल कुतूहल वाटते. अमेरिका देश याविषयी माहीती हवी असेल, एखादा पक्षी, समुद्र, कोकणातील माहिती सुध्दा विश्वकोशातून प्राप्त होऊ शकते. विद्यार्थ्यांना प्रकल्प करण्यासाठी याचा चांगलाच उपयोग होईल व तुमचा प्रकल्प इतरांपेक्षा चांगला होईल. स्पर्धापरीक्षेसाठी मराठी विश्वकोशाच्या माहितीचा शंभर टक्के उपयोग होईल. याच वयात चांगल्या वाचनाची सवय लागावी म्हणून कुमारमराठी विश्वकोश हा मराठी विश्वकोशाचा विज्ञानाशी संबंधित अनेक विषयांची अधिक माहिती हवी असेल तर कुमारविश्वकोशाचा मुलांनी अभ्यास करावा मराठी विश्वकोशाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी याकार्यक्रमाचे येथे आयोजन केले. असे उद्गार संपादकीय सहायक महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ श्रीमती वर्षा देवरुखकर यांनी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई आणि नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नेमळे व श्रीदेवी सातेरी ग्रंथालय व सांस्कृतिक कला क्रीडामंडळ नेमळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नेमळे विद्यालयातील कार्यक्रमात उद्‌गार काढले.

दीपप्रज्वलन व फोटो पूजन

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ.भि. राऊळ म्हणाले, ” साहित्याचे वाचन केल्याने जीवनाला कलाटणी मिळते. यांच्यातूनच भविष्यात चांगले कवी, लेखक निर्माण होऊ शकतात”. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन व फोटो पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निमित्ती मंडळाचे सदस्य महादेव देसाई यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष आ.भि. राऊळ सर यांचा सत्कार करण्यात आला . तसेच मराठी विश्वकोश निमित्ती मंडळ मुंबई संपादकीय सहायक वर्षा देवरुखकर, वामन पंडित, डॉ. शरयू आसोलकर, भरत गावडे, विठ्ठल कदम, मनोहर परब, महादेव देसाई यांचा ही श्रीदेवी सातेरी ग्रंथालयाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष आ.भि. राऊळ यांनी शाल, श्रीफळ व बुके देऊन सत्कार केला.

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य भरत गावडे म्हणाले,” पाठ्यपुस्तक, लेखकांनी लिहिलेली पुस्तके वाचल्याने आपण प्रगल्भ होतो. व्यक्तिमत्त्व विकासीत होते. भाषा संवर्धनासाठी शासनाने असे अनेक उपक्रम हाती घेतलेले आहेत असे म्हणाले.”यावेळी नववीतील विद्यार्थीनी जिज्ञेशा कमलेश भैरे हिने वाचन प्रेरणा दिनानिमित्त डॉ. ए.पी जे अब्दुल कलाम यांचे चित्र काढले त्याचित्राचे अनावरण प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . त्यावेळी सर्वांनी तिचे कौतुक केले.यादिनाचे औचित्य साधून” मला आवडलेले पुस्तक” व “मला आवडलेले पाठ्यपुस्तक” याविषयावर तालुकास्तरीय वाचन स्पर्धा घेण्यात आली. लहान गटातून एकूण 15 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

उपस्थित विध्यार्थी मित्र

प्रथम क्रमांक-दूर्वा विजय गावडे (शाळा दाणोली बाजार), द्वितीय क्रमांक- श्रीकर मंदार शुक्ला (सावंतवाडीनं. 4), तृतीय क्रमांक-हर्ष आनंद रेडकर (नेमळे पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय नेमळे) उत्तेजनार्थ-अन्वी अजित देसाई (शिरशिंगे जि.प.नं. 1), उत्तेजनार्थ- दीक्षा दत्ताराम सावंत (कुणकेरी नं.1) मोठ्या गटातून प्रथम सायली संदीप आळवे (नेमळे विद्यालय) द्वितीय क्रमांक- लतिका हेमंत मेस्री, (नेमळे विद्यालय) तृतीय- हाफिज सर्फराज आजगावकर (नेमळे विद्यालय) उत्तेजनार्थ-निमिष उमेश राऊळ (नेमळे विद्यालय) उत्तेजनार्थ-सोनाक्षी बाजीराव दळवी (नेमळे विद्यालय) मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेचे परीक्षण भरत गावडे, विठ्ठल कदम, मनोहर परब, स्मिता नाईक, अनिल कांबळे यांनी केले. विद्यालयातील विद्यार्थांना पेन व खाऊ महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई यांच्या वतीने देण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शरयू आसोलकर यांनी केले. यावेळी विश्वकोश सदस्या, ज्येष्ठ लेखिका वृंदा कांबळी, वामन पंडित, माजी शिक्षण विस्तार अधिकारी प्रमोद पावसकर, सचिव पांडुरंग दळवी, प्राचार्य आर. के. राठोड, माजी प्राचार्या साधना तेंडोलकर, केंद्राध्यक्ष कवडे, झेंडे सर, राजेश गुडेकर, एम.पी. सारंग, उमेश राऊळ, नितिन धामापूरकर, नेत्रा चव्हाण, आरती कोरगावकर, क्रांती मयेकर, कडावलकर, सगुण नेमण, दिलीप मेस्री, तुकाराम घोगळे, सुस्मिता कासार, कोंडये मॅडम, प्रथमेश करंगुटकर इत्यादी उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल कांबळे यांनी केले आभार महादेव देसाई यांनी मानले.


Spread the love

Related posts

समीर वानखेडे प्रकरणी लपवाछपवीचा खेळ थांबवा,मुंबई हायकोर्टाचे सीबीआयला खडे बोल!

news

श्री समर्थ सद्गुरू अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या उपस्थितीत सावंतवाडीत २५ जानेवारी रोजी होणार सत्संग आनंद सोहळा.

newss

मसुरे मध्ये १८ एप्रिल रोजी प्रथमच महिला पुरुष यांच्या मध्ये २०-२० भजन डबलबारी

news

Leave a Comment