स्टोरी

शालेय विद्यार्थी वाचक स्पर्धेत अन्वी अजित देसाई प्रथम.

Spread the love

सावंतवाडी (भरत गावडे): समर्थ साटम महाराज वाचन मंदिर दाणोली, या संस्थेच्या वतीने डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचक प्रेरणा दिनाच्या औचित्य साधुन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .या स्पर्धेचा निकाल असा प्रथम अन्वी अनिल देसाई जि. प .शाळा शिरशिंगे १ द्वितीय दूर्वा विजय गावडे जि. प .शाळा दा णोली तृतीय जानवी मनोज सावंत जि. प शाळा दाणोली गावठाण उत्तेनार्थ स्वरांजली पांडुरंग राऊळ जि. प. शाळा शिरशिंगे नंबर देवांक मालवणकर जि. प .शाळा दांणोली बाजार कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले . दीप प्रज्वलित करून सं कार्यक्रमाचे नियोजन शालेय विद्यार्थ्यांनी केले होते. त्यांच्याच हस्ते दीप प्रज्वलन व ग्रंथ पूजन करण्यात आले .यावेळी व्यासपीठावर वाचन मंदिर चे अध्यक्ष भरत गावडे ,कार्यकारणी सदस्य गिरीधर चव्हाण, मुख्याध्यापक प्रकाश गावडे, ग्रंथपाल दीपा सुकी,परीक्षकप्रगती परांजपे ,सखाराम तिळवे पांडुरंग राऊळ ,अजित देसाई ,आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक मनोगतामध्ये अध्यक्ष भरत गावडे यांनी वाचक प्रेरणा दिनाचे महत्त्व सांगून विद्यार्थी जीवनामध्ये अवांतर वाचनाचे महत्त्व विशद केले. या स्पर्धेमध्ये एकूण 18 स्पर्धक सहभागी झाले होते. यशस्वी स्पर्धा काना रोख रक्कम स्मृतिचिन्ह ग्रंथ भेट देऊन गौरविण्यात आले यावेळी संवाद कौशल्यासाठी एक वेगळा कार्यक्रम राबवण्यात आला तो असा की दोन शाळातील विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून द्यायचा आपले आवड निवड विचारावे तसेच पाठ्यपुस्तकातील कोणत्या पाठ्यश आपणास आवडला याबद्दल गटागटामध्ये चर्चा करण्यात आली. त्या कार्यक्रमाला विश्वकोश निर्मिती मंडळाचे सदस्य म.ल.देसाई गुरुनाथ राऊळ यांनी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या परीक्षक म्हणून प्रगती परांजपे सखाराम तिळवे यांनी काम पाहिले. उपस्थित सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.


Spread the love

Related posts

‘कवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार’ प्रशासनाच्या उदासीनतेमुळे यावर्षीही संस्कृतदिनी देण्यात येणार नाही!

news

तालुक्यातील पूर परिस्थितीचा शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्याकडून आढावा!

news

माजी नगरसेविका शीतल मंढारी यांच्या प्रयत्नाने कल्याण पूर्व – राजभर नगर परिसरातील पाणी समस्या संपुष्ठात.

news

Leave a Comment