क्राईम

निळा ड्रम प्रकरणात उत्तर प्रदेशच्या मेरठ कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल..!

Spread the love

मेरठ: बहुचर्चित निळा ड्रम प्रकरणात उत्तर प्रदेशच्या मेरठ कोर्टानं महत्वपूर्ण निकाल दिला आहे. हत्याकांड प्रकरणात न्यायालयानं मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांना दोषी ठरवलं होतं. यानंतर आज १४ ऑक्टोबर रोजी न्यायालयानं मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांनायांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे निळा ड्रम प्रकरणात महत्त्वाचं वळण आलं आहे. मुस्कान आणि साहिलला शिक्षा सुनावत असताना न्यायालयानं महाभारताचा उल्लेख केला. शिक्षा देणं हाच धर्म आहे, असं म्हणत न्यायाधीशांनी दोघांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली. यानंतर कोर्ट रुममध्ये भारत माता की जयच्या घोषणा ऐकू आल्या.

या खटल्यात विशेष म्हणजे मुस्कानच्या आई, वडिलांनी लिखित स्वरुपात लेकीसाठी फाशीच्या शिक्षेच्या मागणी केली होती. लेकीला फाशी झाली तरी आम्हाला आक्षेप नसेल. आमचा जावई सौरभ खूप चांगला मुलगा होता, असं मुस्कानच्या आई, वडिलांनी म्हटलं होतं.शिक्षा सुनावण्याआधी दोन्ही दोषींची मानसिक स्थिती ठीक नसल्याचं समोर आलं होतं. मुस्काननं तिच्या मोठ्या लेकीला तुरुंगातून पत्र लिहिलं होतं. मुलींच्या भवितव्याबद्दल तिनं चिंता व्यक्त केली होती. मेरठ कोर्टानं शिक्षा सुनावण्यासाठी आजचा दिवस निश्चित केला होता. मेरठ कोर्टात दोन्ही दोषींना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजर करण्यात आलं. यावेळी दोघे प्रचंड घाबरलेले दिसत होते. साहिलनं गेल्या तीन दिवसांपासून कोणाशीही संवाद साधलेला नाही. तर मुस्काननं तिची मोठी लेक पिहूला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती.


Spread the love

Related posts

देशात १८ ठिकाणी रासायनिक बाँबस्फोट घडवण्याचा होता कट !

news

हुती दहशतवाद्यांकडून भारताच्या मालवाहू जहाजाचे अपहरण….

news

वर्धा जिल्हा पोलिसांची जुगाराच्या अड्डयावर धाड..! संशयित आरोपी ताब्यात.

Leave a Comment