शिक्षण

सेवा संकल्प अभियानांतर्गत केंद्रस्तरीय स्पर्धांमध्ये कोनशी शाळेचे यश!

Spread the love

सावंतवाडी (कोनशी): जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग व पंचायत समिती, सावंतवाडीच्या शिक्षण विभागामार्फत आयोजित ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ तांबुळी केंद्रस्तरीय चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा निकाल २०२६ मध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, कोनशीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. चित्रकला आणि वक्तृत्व या दोन्ही स्पर्धांमध्ये कोनशीच्या विद्यार्थ्यांनी आपली प्रतिभा सिद्ध करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.चित्रकला स्पर्धेत सानिका गवस प्रथम चित्रकला स्पर्धेच्या इयत्ता पाचवी ते सातवी गटात कोनशी शाळेतील सानिका संतोष गवस हिने प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या यशामुळे शाळेच्या कलात्मक गुणवत्तेची आणि विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेची प्रचिती आली. याच स्पर्धेच्या इयत्ता तिसरी ते चौथी गटात कोनशी शाळेच्या तीर्था निलेश बर्वे हिने तृतीय क्रमांक मिळवला.वक्तृत्व स्पर्धेत वेदांत बर्वे प्रथमवक्तृत्व स्पर्धेतही कोनशीच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी केली.

तीर्था निलेश बर्वे
अथर्व धनंजय जोशी

इयत्ता पाचवी ते सातवी गटात वेदांत निलेश बर्वे याने प्रथम क्रमांक मिळवून आपल्या वक्तृत्व कौशल्याची छाप पाडली. इयत्ता पहिली ते दुसरी गटात अथर्व धनंजय जोशी याने द्वितीय क्रमांक, तर इयत्ता तिसरी ते चौथी गटात तीर्था निलेश बर्वे हिने प्रथम क्रमांक मिळवला. या यशामुळे कोनशी शाळेने चित्रकला आणि वक्तृत्व या दोन्ही क्षेत्रांत आपली गुणवत्ता अधोरेखित केली आहे. विशेष म्हणजे, तीर्था बर्वे हिने चित्रकला आणि वक्तृत्व या दोन्ही स्पर्धांमध्ये क्रमांक मिळवत दुहेरी यश संपादन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहनविद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देणे, कल्पनाशक्ती विकसित करणे, विचार प्रभावीपणे मांडण्याची क्षमता वाढवणे आणि आत्मविश्वास वृद्धिंगत करणे, या दृष्टीने अशा स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरतात. कोनशी शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश त्यांच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि शैक्षणिक-सहशैक्षणिक उपक्रमांतील सहभागाचे फलित मानले जात आहे.

वेदांत निलेश बर्वे
सानिका संतोष गवस

या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तांबुळी केंद्रप्रमुख ज्योत्स्ना देसाई, मुख्याध्यापक श्री बाबुराव पास्ते, पदवीधर शिक्षक डॉ. राजेंद्र चव्हाण, उपशिक्षिका श्रीम. स्वाती देसाई, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सौरभ सिद्धये व उपाध्यक्ष श्री. सिद्धेश गवस, कोनशी ग्रामस्थ व पालकांकडून अभिनंदन केले. त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे कोनशी शाळेच्या शैक्षणिक आणि सहशैक्षणिक प्रगतीला नवी प्रेरणा मिळाली आहे.


Spread the love

Related posts

तर ग्रामीण भागातील शाळा कायमस्वरूपी बंद पडतील..! माजी सभापती उदय परब

news

चला संविधान समजून घेऊया…! जि.प. शाळा ओसरगाव नंबर १ मध्ये मासूमचा पहिला बालमेळावा उत्साहात

प्रसाद परब

शाळा नं. २ चा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न.

news

Leave a Comment