स्टोरी

बांधकाम विभागाचे अधिकारी विजय चव्हाण यांचा सह्याद्री फाउंडेशन तर्फे सत्कार.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: वेंगुर्ले सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी विजय नामदेव चव्हाण यांची पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे. श्री चव्हाण यांचा सत्कार सह्याद्री फाउंडेशन तर्फे करण्यात आला. यावेळी सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ म्हणाले सावंतवाडी दोडामार्ग या दोन तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागात गेली 23 वर्षाहून अधिक काळ विजय चव्हाण यांनी प्रामाणिक आणि उत्कृष्ट असे काम केले आहे. जनतेला अभिप्रेत असलेले काम हे करत आहेत. त्यांची पदोन्नतीने झालेली बढती खरोखरच आनंदाची बाब आहे. ते निश्चितपणे चांगले काम करतील अशा शुभेच्छा दिल्यासह्याद्री फाउंडेशन तर्फे श्री चव्हाण यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक रवींद्र मडगावकर माजी सभापती प्रमोद सावंत, ॲड. संतोष सावंत, हर्षवर्धन धारणकर, प्रल्हाद तावडे,सुहास सावंत, अशोक सांगेलकर, गजानन बांदेकर,सुनील खानोलकर आधी उपस्थित होते.

यावेळी सत्काराला उत्तर देताना श्री चव्हाण म्हणाले, मी गेले 23 वर्ष सावंतवाडी व दोडामार्ग या दोन तालुक्यात काम केले आहे. मला येथील जनतेचे व सर्वांचे चांगले सहकार्य मिळाले. वेंगुर्ले उपविभागीय कार्यालयात माझी झालेली बढती ही निश्चितच मी सार्थकी लावेन. सह्याद्री फाउंडेशन ने माझा हा सन्मान केला याबद्दल मी त्यांचे निश्चितच ऋणी राहीन. असे ते म्हणाले. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र मडगावकर, ऍड. संतोष सावंत, प्रमोद सावंत, खजिनदार हर्षवर्धन धारणकर यांनी विजय चव्हाण हे प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे त्यांनी फाउंडेशन मध्ये चांगले असे काम केले आहे. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देणे आणि एखादे काम सांगितले तर ते तडीस नेणे ही त्यांची काम करण्याची पद्धत आहे. त्यांनी असे चांगले काम करत रहावे. अशा शुभेच्छा दिल्या.


Spread the love

Related posts

दांडी येथील रुक्मिणी पंढरीनाथ देसाई यांचे निधन. 

news

संगीता पाटील यांचे कार्य महान! श्रुती ताई उरणकर

news

बिडीओ परागिणी पाटील यांचे सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघ सिंधुदुर्गकडून स्वागत.

प्रसाद परब

Leave a Comment