स्टोरी

मसुरे भरतगड इंग्लिश मीडियम च्या वतीने दहावीतील गुणवंतांचा वार्षिक गुणगौरव…!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: मसुरे येथील माता काशीबाई महादेव मेमोरियल चारिटेबल ट्रस्ट आणि भरतगड इंग्लिश मीडियम मसुरे मर्डे यांच्यावतीने मसुरे परिसरातील शाळांमधील इयत्ता दहावी मध्ये एक ते तीन क्रमांक मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा वार्षिक गुणगौरव तसेच विविध परीक्षेमध्ये यशस्वी ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मसुरे भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल मर्डे च्या सभागृहामध्ये माजी जि प अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. ज्येष्ठ कामगार नेते व भरतगड इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक श्री जयवंत परब साहेब यांच्या जयंतीनिमित्त या विशेष वार्षिक गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन प्रतिवर्षी करण्यात येते.

यावेळी माजी जी प अध्यक्ष तथा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षसंग्राम नारायण प्रभूगावकर, उपाध्यक्ष श्रीराम परब, डॉ. डॉ.अनिरुद्ध मेहंदळे,समर्थ सहकारी पतपेढी मसुरेचे शाखा व्यवस्थापक संतोष सावंत , शाळा व्यवस्थापन समिती सदस्य डॉ.वीणा मेहंदळे , केशव भोगले ,विश्वनाथ परब, जगदीश चव्हाण, संदीप हडकर,पूजा ठाकूरजि. प.सदस्य क्षमा हडकर,माझी जि प अध्यक्ष सरोज परब, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, मसुरे एज्युकेशन सोसायटी लोकल कमिटी अध्यक्षराजन परब, रमेश पाताडे सर, एम आय टी एम कॉलेजचे शिक्षक झाटये सर,लक्ष्मी सावंत, मुख्याध्यापिका संतोषी मांजरेकर मॅडम आणि प्रशालेतील सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, माता काशीबाई महादेव मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक, आजी-माजी विद्यार्थी, पालक ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थितीत होते.गुणवंत सर्व विद्यार्थ्यांना भरतगड इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. माझी जि प अध्यक्ष संग्राम प्रभू गावकर यांनी यावेळी उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.यावेळी एम आय टी एम या कॉलेजच्या वतीने सुद्धा गुणवंतांचा गौरव करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी गुणवंतांना शुभेच्छा दिल्यात.

यावेळी चैतन्य भोगले,सूरज मसुरकर,नेहा शिंगरे, अथर्व कुशे ,विराज परब निधी पेडणेकर, यश हरेश तेंडोलकर, विजय मेस्त्री, आर्या मुणगेकर, रिया मुणगेकर, मंथन राणे, भार्गवी प्रभुदेसाई, मयुरी चव्हाण,प्रतिक्षायेसजी, आदर्श तांबे, साहिल मसुरकर,ऋग्वेद बागवे,वैष्णवी पालव, मुकुंद मुळये तनिष्क मुळीक, अथांग आंगणे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका संतोषी मांजरेकर मॅडम यांनी तर सूत्रसंचालन सायली म्हाडगुत यांनी केले.


Spread the love

Related posts

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेश चतुर्थी कालावधीत गावागावात तरुणाई भजनात दंग.

news

उत्तर रेल्वे प्रशासनाने दोन मशिदींच्या व्यवस्थापनाला बाजावली नोटीस!

news

तलाठी परीक्षेमध्ये घोटाळा झाला नसल्याचा वरिष्ठ अधिकार्‍यांचा दावा…. !

news

Leave a Comment