स्टोरी

कलंबिस्त ज्ञानमंदिर वाचनालयाला महेश कलंबिस्तकर यांच्या स्मरणार्थ ३१२० रुपये किंमतीची नविन पुस्तकांची देणगी.

Spread the love

सावंतवाडी (कलंबिस्त): कलंबिस्त ज्ञानमंदिर वाचनालयाला सावंतवाडीतील सैनिक पतसंस्थेचे कर्मचारी तथा सामाजिक कार्यकर्ते श्याम विश्राम कलंबिस्तकर यांनी त्यांचे भाऊ महेश कलंबिस्तकर यांच्या स्मरणार्थ ३१२० रुपये किंमतीची नविन पुस्तके देणगी. स्वरूपात दिली. ते म्हणाले कलंबिस्त गावात ज्ञानमंदिर वाचनालयाचे उभारणी करण्यात आली आहे. हे वाचनालय निश्चितच गावाच्या विकासाला गती देणारे आहे. यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक तथा कलंबिस्त ज्ञानमंदिर वाचनालयाचे माजी सचिव ॲड. संतोष सावंत यांनी श्याम कलंबिस्तकर यांनी वाचनाला पुस्तके देणगी स्वरूपात देऊन गावातील मुलांना वाचनाची गोडी लागावी या हेतूने त्यांनी ही पुस्तके दिली आहेत. त्यांचा हेतू उत्तम आहे. निश्चितच ज्ञान मंदिर वाचनालय त्यांना अभिप्रेत असलेले काम करेल. यावेळी वाचनालयाचे सचिव अनिल सावंत, माजी अध्यक्ष रूपा सावंत, उपाध्यक्ष रमेश सावंत, तथा माजी पंचायत समिती सदस्य रमेश सावंत, ग्रंथपाल दीपा जाधव आदी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण

news

जादूगार वैभव कुमार यांना राष्ट्रीय ‘आर्टबीट्स इंडिया एक्सलन्स अवॉर्ड’..! कोकणच्या सांस्कृतिक क्षेत्रात अभिमानाची बातमी.

प्रसाद परब

आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून कोळंब-न्हिवे येथील श्री देव ब्राह्मण मंदिर सभामंडपासाठी १० लाख रु.निधी मंजूर

news

Leave a Comment