स्टोरी

आज सावंतवाडी येथे जनता आरोग्य दरबाराचे आयोजन.

Spread the love

सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणि नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समिती आयोजित जनता आरोग्य दरबार सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ आरोग्य दरबार म्हणजे काय? ​हा असा मंच आह, ,जिथे सामान्य नागरिक आरोग्य क्षेत्रातील आपल्या समस्या, तक्रारी आणि सूचना थेट जिल्हा प्रशासनाच्या मुख्य अधिकारी तसेच पालकमंत्री व पदाधिकाऱ्यांसमोर मांडू शकतात. या समस्यांचे निवारण कशाप्रकारे करता येईल हे समजून घेता येईल.

कोणते प्रश्न मांडता येतील? ​जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रातील असुविधा, ​वैद्यकीय सेवा नाकारल्या गेल्या असल्यास त्याबद्दलची तक्रार, ​आरोग्य केंद्रांमधील कर्मचारी किंवा डॉक्टरांच्या अनुपस्थितीबाबत समस्या, ​आरोग्य व्यवस्थेत आवश्यक असलेल्या सुधारणांविषयी सूचना, रुग्णालयात आपल्याला आलेले अनुभव जसे की मध्यरात्री औषधे बाहेरून आणायला लावणे, उपजिल्हा रुग्णालय असा दर्जा असताना देखील छोट्या गोष्टींसाठी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग अगर गोवा येथे रेफर करणे या बाबी देखील आपल्याला लिखित स्वरूपात मांडता येतील.• नागरिकांना आलेले अनुभव अधिकाऱ्यांसमोर प्रत्यक्ष उपस्थित राहून मांडता येतील. त्यावर काय उपाययोजना होईल हे समजून घेता येईल.

कोण उपस्थित राहणार?​

तुमचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी सिंधुदुर्गचे पालकमंत्री मा. ना. नितेशजी राणे, मा. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी (Z.P.), जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत.​ आपली तक्रार/निवेदन कसे द्यावे?

​१. आपले निवेदन किंवा आपली तक्रार मा. जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या नावे लेखी स्वरूपात तयार करावी.

२. सदर निवेदन १९ एप्रिल २०२६ पर्यंत खालील पत्त्यावर जमा करावी ही विनंती.

​सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समिती कार्यालय, ​राजू केळुसकर, संजय स्टोअर्स, आदिनारायण मंगल कार्यालय शेजारी,• सालईवाडा, सावंतवाडी.• मोबाईल नंबर- 7083974400 किंवा कृती समिती निमंत्रक श्री.एन बी रेडकर 9422381730श्री.रवी जाधव 9405264027श्रीमती रूपा मुद्राळे 9422633971​.

कार्यक्रमाची वेळ आणि ठिकाण• ​तारीख: बुधवार, २९ एप्रिल २०२६• ​वेळ: सकाळी १०:०० वाजता• ​स्थळ: बॅरिस्टर नाथ पै सभागृह, सावंतवाडी​.

लक्षात ठेवा: आरोग्य सुविधा सुधारण्याबाबत तुमची एक तक्रार किंवा सूचना संपूर्ण जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेत बदल घडवू शकते. नक्की सहभागी व्हा!​आयोजक: सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समिती, सावंतवाडी


Spread the love

Related posts

पोषण आहाराची बिले जूनपासून थकली, महिला आचाऱ्यांवर उपासमारीची वेळ.

newss

अखिल भारतीय संविधान रक्षक संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी यशवंत जाधव.

news

मराठा महासंघाच्या वतीने सावंतवाडी शहरात तीन दिवस कमर्शियल व्हेईकल एक्स्पोचे आयोजन..! अभिषेक सावंत

news

Leave a Comment