क्राईम

कुडाळ तालुक्यात ‘ऑल आऊट ऑपरेशन’ अंतर्गत अवैध बंदूक कारखाना उद्ध्वस्त..!

Spread the love

कुडाळ, दी. २८ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुन्हेगारीविरोधात सुरू असलेल्या ‘ऑल आऊट ऑपरेशन’ अंतर्गत कुडाळ तालुक्यातील निरुखे-सुतारवाडी येथे सुरू असलेला बेकायदेशीर बंदूक निर्मितीचा कारखाना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अक्षरशः उद्ध्वस्त केला. गुरुवारी रात्री उशिरा टाकलेल्या या धाडीत पोलिसांनी तीन तयार बंदुका, सहा लोखंडी बॅरल आणि शस्त्रनिर्मितीचे मोठे साहित्य असा तब्बल १ लाख १४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पत्र्याच्या शेडमध्ये सुरू होता ‘डेथ फॅक्टरी’चा खेळ

गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अचानक छापा टाकला. निरुखे येथील एका साध्या पत्र्याच्या शेडमध्ये हा कारखाना सुरू असल्याचे समोर आले. आतमध्ये बंदुकांचे बॅरल, लाकडी बट, वेल्डिंग मशीन, ग्राइंडर आणि इतर तांत्रिक साहित्य पाहून पोलिसांनाही धक्का बसला.

एक आरोपी जेरबंद | हत्यार कायद्यानुसार गुन्हा

या प्रकरणी जगन्नाथ शंकर मेस्त्री (वय ६५, रा. निरुखे-सुतारवाडी) याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ३, ५ आणि २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.*आधी किती बंदुका विकल्या? तपासाची दिशा गंभीर*या कारखान्यातून यापूर्वी किती शस्त्रे तयार करून विकली गेली, कोणकोण या जाळ्यात सामील आहेत, याचा आता पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. स्थानिक नागरिकांमध्ये या ठिकाणाहून अनेक बंदुकांची विक्री झाल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

परिसरात भीतीचे वातावरण

गुन्हेगारांचे धाबे दणाणलेया कारवाईनंतर निरुखे पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली असून अवैध शस्त्रनिर्मिती करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांचा हा ‘सर्जिकल स्ट्राईक’ पुढील काळात आणखी मोठे रॅकेट उघड करण्याचे संकेत देतो.


Spread the love

Related posts

मडगांव एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या महिलेची पर्स चोरट्याने लांबवली.

news

ओव्हरलोड खडी आणि वाळू वाहतूकिकडे उपप्रादेशिक परिवहन विभाग सिंधुदुर्गकडून दुर्लक्ष!

news

बिहारमध्ये धर्मांध मुसलमानांनी घडवलेल्या दंगलीत हिंदूंची कोट्यवधी रुपयांची हानी ! दुकाने जाळून खाक

news

Leave a Comment