स्टोरी

प्रविण खोलंबे यांना कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

Spread the love

पुणे: अखिल मराठी साहित्य, सांस्कृतिक,कला विकास परिषद, पुणे या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा या वर्षीचा शिक्षण क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा असा कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार प्रविण खोलंबे यांना जाहीर झाला आहे. मराठी साहित्य क्षेत्रात प्रविण खोलंबे. यांचं उल्लेखनीय योगदान आहे.‌ ते विविध विषयांवर सातत्याने लेखन करत आहेत. विविध विषयांवर वैचारिक लेखन केले आहे. महाराष्ट्राची लोककला हा संदर्भ लेख संग्रह, कवी, लेखक, निवेदक, सुलेखनकार, समुपदेशक अशी विविध बिरुदे त्यांच्यावर लावली जात आहेत.विविध विषयाचे वाचन करुन विद्यार्थ्यांवर अमुल्य असे संस्कार देत असतात.

विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास कसा करता येईल? यासाठी ते विविध उपक्रम घेत असतात. त्यांच्या साहित्यीक, सामाजिक, शैक्षणिक प्रवासाचे असे अनेक पैलू समाजाला मार्गदर्शन करित आहेत. म्हणूनच त्यांच्या निष्कलंक व प्रशसनीय कार्याचा गौरव म्हणून,मराठी साहित्य, सांस्कृतिक, कला विकास परिषद. महाराष्ट्र राज्य. यांच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते सन्मान पूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

दि.२६ एप्रिल २०२६ रोजी.कविवर्य मोरोपंत नाट्य मंदिर,बारामती याठिकाणी १४ वे शिव, फुले,शाहू,आंबेडकर, राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, क्रांतीवीर राजे उमाजी नाईक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,शाहीर अमर शेख, मराठी साहित्यिक , सांस्कृतिक कलावंत संमेलन संपन्न होणार आहे.


Spread the love

Related posts

भरतगड इंग्लिश मिडियमच्या विध्यार्थ्यांची ‘बांधावरची शेतीशाळा’!

news

प्रशासनाला कधी जाग येणार? सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांचा प्रश्न….

news

मसुरे येथे जागतिक आपत्ती धोका निवारण दिन संपन्न…

news

Leave a Comment