स्टोरी

कांदळगाव येथे ग्रंथ प्रदर्शनास प्रतिसाद.

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: कांदळगाव येथील श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालय या शासनमान्य सार्वजनिक वाचनालयामध्ये दिनांक २७ व २८ फेब्रुवारी ज्ञानपीठ विजेते प्रसिद्ध मराठी साहित्यिक वि . वा . शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षी साजरा केला जाणार मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने ग्रंथालयात विविध विषयावरील ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. वाचकांमध्ये तसेच विद्यार्थी व युवावर्गामध्ये वाचनाची अधिकाधिक आवड निर्माण व्हावी व त्यांचा कल वाचनाकडे वाढून वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी या उदात्त हेतूने ग्रंथालयाच्या वतीने आयोजित केलेल्या या ग्रंथ प्रदर्शनाला शाळेतील मुलांचा व वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन अध्यक्ष श्री उदय परब यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे कार्यवाह श्री प्रविण पारकर, खजिनदार श्री गजानन सुर्वे, जि. प. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती संध्या मेथर, उपशिक्षिका सौ कर्णे, ग्रंथपाल सौ. साक्षी मेस्त्री, कर्मचारी श्री महेश साळकर, आदी मान्यवर व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

कोरोनाची लागण झालेल्या लोकांमध्ये हृदयविकार आणि रक्तदाब यांचा त्रास वाढला ! – अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था

news

मिरा रोडमध्ये धाडसत्र: सी क्वीन पॅलेस ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांची मोठी कारवाई, १२ मुलींना ताब्यात घेतले

प्रसाद परब

आजच्या डिजिटल युगात संस्कारित मुलं घडवण्यासाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या सुप्रसिद्ध लेखक मनोज अंबिके यांनी लिहिलेली आणि बेस्टसेलर ठरलेली चार पुस्तकं

news

Leave a Comment