स्टोरी

ओसरगाव शाळेत व्यक्तिमत्व विकास व संवाद कौशल्य कार्यशाळा संपन्न!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी:
सर्व गुणसंपन्न विद्यार्थी घडविण्यासाठी व्यक्तिमत्व विकास व संवाद कौशल्य अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापक किशोर कदम यांनी केले.
संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ यांच्या जीवन विस्तार विभागातर्फे ओसरगाव नं. 1 शाळेत एक तासाची प्रभावी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुशल विद्यार्थी घडविण्यासाठी महाविद्यालयाचे मोलाचे कार्य सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून ही कार्यशाळा पार पडली.
या कार्यशाळेत प्रणित परब व जय वळंजू हे विद्यार्थी उपस्थित होते. त्यांनी अतिशय सुंदर, रंजक व समजेल अशा पद्धतीने विद्यार्थ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यशाळेचा लाभ घेतला.
यावेळी मुख्याध्यापक किशोर कदम, पदवीधर शिक्षक शितल दळवी तसेच उपशिक्षक राजश्री तांबे उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची गरज असून शाळेच्या वतीने महाविद्यालयाचे आभार मानण्यात आले.


Spread the love

Related posts

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना मुख्य संघटक यश सरदेसाई यांचा सिंधुदुर्ग दौऱ्यास सावंतवाडीतुन सुरुवात.

news

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘अमृत भारत रेल्वे स्थानक’ योजनेचे उद्घाटन !

news

ओरोस येथे नि:शुल्क उद्योजकता विकास प्रशिक्षण सुरू असलेल्या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी भेट दिली.

news

Leave a Comment