Uncategorized

कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा- सावंतवाडी व स्टेपिंग स्टोन स्कूल ग्लोबल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ”मराठी भाषा गौरव दिना”चे आयोजन.

Spread the love

सावंतवाडी: कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा- सावंतवाडी व स्टेपिंग स्टोन स्कूल ग्लोबल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ”मराठी भाषा गौरव दिना”चे आयोजन करण्यात आले आहे. कोलगाव येथील स्टेपिंग स्टोन स्कूलमध्ये हा कार्यक्रम होणार असून गंथ्रदिंडी, बाल साहित्य प्रदर्शन हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण असणार आहे.कुसुमाग्रज वि.वा. शिरवाडकर यांच्या जयंती निमित्त राज्यभरात ‘मराठी भाषा गौरव दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सावंतवाडीत कोलगाव येथे या दिनाचे औचित्य साधून मराठी भाषेची समृद्धी आणि कुसुमाग्रजांचे योगदान याचा जागर केला जाणार आहे. शुक्रवार २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८. ४५ वा. ग्रंथ दिंडीने या कार्यक्रमास प्रारंभ होणार आहे. तसेच बाल साहित्य प्रदर्शन उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रांताधिकारी समीर घारे उपस्थित राहणार आहेत. तर अध्यक्षस्थानी कोमसाप जिल्हाध्यक्ष मंगेश मसके राहणार आहेत. ज्येष्ठ मालवणी कवी दादा मडकर्ईकर, स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे संचालक ॲड. रूजूल पाटणकर, कोमसाप सावंतवाडी अध्यक्ष दीपक पटेकर, केंद्रीय कार्यकारिणी सदस्या साहित्यिका उषा परब, कोमसाप जिल्हा सचिव ॲड.संतोष सावंत आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती यावेळी असणार आहे.‌ मराठी भाषेचा गौरव या कार्यक्रमात होणार असून चिमुकल्यांची सादरीकरण खास आकर्षण आहेत. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन कोमसाप शाखा सावंतवाडीच्या वतीने करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

आपल्याला एकमेकांविरोधात उभे राहून या शहराला विकासापासून दूर ठेवायचे नाही…! नगराध्यक्ष – श्रद्धा लखमसावंत भोसलें

प्रसाद परब

एकनाथ शिंदेंनी अजित पवारांवर केलेल्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं एका वाक्यात प्रत्युत्तर;

news

गोहत्या बंदी कायद्याला विरोध करणार्‍या कम्युनिस्टांना अचानक गो-प्रेमाचा उमाळा..

news

Leave a Comment