Uncategorized

ओसरगाव नं. १ शाळेत विज्ञान प्रयोगांच्या पुस्तकांचे वाटप!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: ओसरगाव नं. १ शाळेमध्ये विज्ञान विषयाची आवड आणि जिज्ञासा वाढविण्याच्या उद्देशाने श्री. दत्तात्रय शिवराम हिर्लेकर गुरूजी यांनी “मानव आणि विज्ञान – टाकाऊपासून टिकाऊ साहित्य निर्मिती” या विषयावरील ३५ विज्ञान प्रयोगांचे उपयुक्त पुस्तक २३ विद्यार्थ्यांना भेट दिले. तसेच शाळेच्या ग्रंथालयासाठी पाच पुस्तके देऊन त्यांनी शाळेच्या शैक्षणिक कार्यात मोलाची भर घातली.या पुस्तकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल प्रयोगशीलता, सर्जनशीलता आणि नवोन्मेषी विचारसरणी विकसित होण्यास मोठी मदत होणार आहे. टाकाऊ वस्तूंमधून टिकाऊ साहित्य तयार करण्याची संकल्पना विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन व स्वावलंबनाची महत्त्वपूर्ण शिकवण देणारी ठरणार आहे.हिर्लेकर सरांचा हा स्तुत्य उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिशादर्शक ठरेल असे शाळेचे मुख्याध्यापक किशोर कदम यांनी प्रतिपादन केले.या प्रसंगी मुख्याध्यापक किशोर कदम, पदवीधर शिक्षिका शितल दळवी, उपशिक्षक राजश्री तांबे व प्रमिता तांबे उपस्थित होते.


Spread the love

Related posts

अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आंबोली हिरण्यकेशी येथे महाअअभिषेक संपन्न.

news

अत्याधुनिक दर्जाच्या ‘एके-२०३’ रायफली भारतीय लष्कराच्या ताफ्यात दाखल.

news

मुख्याध्यापक गिते सर यांचे विध्यार्थ्यांना पत्रलेखन..!

प्रसाद परब

Leave a Comment