स्टोरी

कलंबिस्त हायस्कूलमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत व.मोफत पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम संपन्न.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्त मध्ये नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागताचा ‘प्रवेशोत्सव व मोफत पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम’ संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर कलंबिस्त पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक श्री.सुभाष सावंत, श्री. वसंत सावंत, श्री. सूर्यकांत राजगे, कलंबिस्त उपसरपंच श्री.सुरेश पास्ते, पालक शिक्षक संघ सदस्या श्रीम.अश्विनी गोसावी, मुख्याध्यापक श्री.अभिजीत जाधव,पालक श्री.रविंद्र तावडे, श्री.गणू सावंत, श्रीम. सावंत, प्रशालेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी नवीन शैक्षणिक वर्षात शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण करून व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर शासनामार्फत पुरविण्यात येणाऱ्या मोफत पाठ्यपुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक श्री. सुभाष सावंत, मुख्याध्यापक श्री. अभिजीत जाधव,शिक्षक श्री.विलास चव्हाण, श्रीम. विनिता कविटकर आदींनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. किशोर वालावलकर यांनी तर आभारप्रदर्शन श्रीम.श्रद्धा पराडकर यांनी केले.

 


Spread the love

Related posts

देशातील एआयमध्ये अग्रेसर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरक्षेचा कणा सीसीटिव्ही यंत्रणा ठप्प.

प्रसाद परब

जालन्यामध्ये पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली सर्वीस्तर माहिती!

news

मालवण येथे ‘राजकोट’ किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे आज भूमीपूजन

news

Leave a Comment