स्टोरी

सावंतवाडी येथे १४ जून रोजी ‘सम्राट संगीत सितारा प्राथमिक फेरी संपन्न

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सम्राट क्लब इंटरनॅशनल गोवा राज्य आयोजित सम्राट संगीत सितारा ही गोव्यातील प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित गायन स्पर्धेचे यंदाचे हे एकोणीसावे वर्ष आहे.

 

सम्राट संगीत सिताराची पहिली प्राथमिक फेरी शनिवार दि. १४ जून रोजी सकाळी ९.३० वा. गोठोसकर मंगल कार्यालय,सावंतवाडी येथे संपन्न झाली. प्रमुख अतिथी म्हणून सावंतवाडीच्या युवराणी सौ.श्रद्धा भोंसले उपस्थित होत्या. मंगेश गांवकर ह्यांनी मान्यवरांचे स्वागत केले. मनोज कारापूरकर ह्यांनी सम्राट संगीत सिताराबद्दल माहिती दिली. प्रवीण सबनीस, पांडुरंग गांवकर, विनोद मळीक, शशिकांत पुनाजी, अविन नाईक, प्रसाद प्रभूगांवकर, ओंकार शेट नार्वेकर, वतन फुलारी, लक्ष्मण जल्मी, साईनाथ देसाई, तुकाराम शेटगांवकर,सर्वेश फुलारी असे मान्यवर ह्याप्रसंगी उपस्थित होते.

 

मुंबई, सावंतवाडी, माणगाव अश्या विविध भागातील १४ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. ३ स्पर्धकांची उपांत्य फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. त्यांना पदक देऊन सन्मानीत करण्यात आले. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्रके देण्यात आली.

 

परिक्षिका म्हणून सम्राट विदुषी प्रचलाताई आमोणकर व श्रीमती प्रीती वारंग ह्यांनी काम पाहिले. नीलेश मेस्त्री ह्यांनी हार्मोनियम वर व वतन फुलारी ह्यांनी आभार मानले. डॉ. रश्मिना आमोणकर ह्यांनी कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन केले.


Spread the love

Related posts

असोली गावातील जोसोली वाडीत शेतकऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन!

news

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे तसेच इतरांविरुद्ध तक्रार दाखल

news

मसूरे बाजारपेठ येथे दुमदूमल्या शिवगर्जना!

news

Leave a Comment