राजकारण

६०० कोटींचा गैरव्यवहार सापडल्याचा ईडीचा दावा खोटा! तेजस्वी यादव

Spread the love

राजद प्रमुख लालू यादव यांच्या कुटुंबावर ईडीच्या छापेमारीतून ६०० कोटी रुपयांचे आर्थिक गुन्हे उघडकीस आल्याचा दावा ईडी ने केला आहे. यावरून उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. काय म्हणाले तेजस्वी यादव? भ्रामक अफवा पसरविण्याऐवजी किंवा सूत्रांच्या हवाल्याने बातम्या पसरवण्याऐवजी भाजपने छापा टाकल्यानंतर स्वाक्षरी केलेला पंचनामाच सार्वजनिक करावा. असे आव्हान तेजस्वी यादव यांनी दिले आहे.राजदने १५० कोटींचा बंगला चार ४ लाखांना विकत घेतल्याच्या प्रकरणात ईडीला ट्विटरवर प्रश्न विचारले आहेत. १५० कोटींचे घर फक्त ४ लाखांत खरेदी केल्याचे पुरावे द्या. १५-२० वर्षांपूर्वीच्या घराची किंमत आणि आजची किंमत सारखीच आहे का? इमारत विकत घेता येते, घर नाही, हे आरोप करणाऱ्यांना कळणार नाही. भाजप आता, कथित ६०० कोटींचा हिशेब करण्यापूर्वी, तुम्ही याचाही हिशेब दिला असता तर बरे झाले असते, असेही तेजस्वी यादव म्हणाले. ठिकठिकाणी छापे टाकण्यात आले. यामध्ये तेजस्वी यादव यांच्यासह तपास पथक लालू यादव यांच्या मुलींच्या घरीही पोहोचले होते. ईडीने सांगितले की १ कोटी रोख, १९०० डॉलर, ५४० ग्रॅम सोने आणि दीड किलो सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.


Spread the love

Related posts

महाराष्ट्रातील १८ लाख सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे! सरकारच्या वतीने त्यांना जे चांगले देता येईल ते देण्याची आमची जबाबदारी आहे! देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

news

फडणवीसांना ७ वर्षांपूर्वीच्या घोषणेची आठवण विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी करून दिली आठवण

news

शिवसेनेच्या ४० आमदारांमुळं भाजप पुन्हा सत्तेत! खासदार गजानन किर्तीकर

news

Leave a Comment