स्पोर्ट

राज्यस्तरीय शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत कु. हेमांगी मेस्त्री प्रथम…! राष्ट्रीय शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: अकोला येथे झालेल्या राज्यस्तरीय १७ वर्षांखालील शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत चराठा येथील कु. हेमांगी गजानन मेस्त्री या विद्यार्थिनीने ८४ किलो वजनी गटात २९५ किलो वजन उचलत प्रथम क्रमांक घेत सुवर्ण पदक पटकाविले. या स्पर्धेत तिने कोल्हापूर विभागाचे नेतृत्व केले होते. कु. हेमांगी मेस्त्री हिची आता राष्ट्रीय शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

चराठा गावची कन्या असलेली कु. हेमांगी मेस्त्री ही माजगाव येथील श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववीत शिकत आहे. कु. हेमांगी मेस्त्री हिने यापूर्वी अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. हेमांगी मेस्त्री हिचे वडील होमगार्ड मध्ये पलटण नायक आहेत. तिच्या या यशात कुटुंबियाचीही महत्त्वाची साथ आहे. कु. हेमांगी मेस्त्री हिला तिचे कोच मंगेश घोगळे, कोकण सिंधू पावर लिफ्टिंग असोसिएशन, पोलीस उपनिरीक्षक संजय साटम, गणेश वांगणकर, डॉ शशांक साटम मोलाचे मार्गदर्शन लाभले. तिचे शिक्षण सहाय्यक संस्थेचे अध्यक्ष भास्कर कासार सचिव सीए लक्ष्मण नाईक, श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.


Spread the love

Related posts

बबलू गावकर मित्रमंडळ यांच्यावतीने भव्य खुल्या ओव्हरआर्म ध्रुव चषक २०२६ या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.

newss

राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत श्री पंचम खेमराज कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी सायली सखाराम सावंत राज्यात प्रथम.

news

द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय वर्षा मॅरेथॉन व राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न.

news

Leave a Comment