स्टोरी

मसूरे मार्गाचीतड येथे माघी गणेश जयंतीउत्सव साजरा होणार..!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: मसूरे मार्गाचीतड येथील श्री महागणपती विश्वस्त मंडळाच्या वतीने ३१ जानेवारी ते ०१ फेब्रुवारी या कालावधीत “माघी श्री गणेश जयंती” उत्सव साजरा करण्यात येत आहे.

 ३१ जानेवारी रोजी सकाळी ०८.३० ते ०९.०० वा.सहस्त्र नामजप सोहळा, सकाळी ९.३० ते १२.०० वा.सामुदायिक एकादशमी सोहळा, दुपारी १२.३० नंतर महा आरती व तीर्थप्रसाद, सायं. ०७.०० ते ०८.०० वा.सुश्राव्य भजने, रात्रौ. ०८.०० ते १०.३० वा. श्री पावणाई देवी दिंडी भजन मंडळ माळगांव, हूमरोसवाडी वारकरी दिंडी भजन.

०१ फेब्रुवारी रोजी सकाळी ०८.०० ते ०९.०० वा.श्री महागणपती पूजा व अभिषेक, सकाळी ९.०० ते १२.३० वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२.३० ते १.०० वा.महा आरती व तीर्थप्रसाद, दुपारी ०१.०० वा. ते ३.०० वा. महाप्रसाद, दुपारी ३.०० ते ५.०० वा.हळदीकुंकू समारंभ, सायं. ७.०० वा. रात्रौ. ९.३० वा. सुश्राव्य भजन – श्री महागणपती विश्वस्त मंडळ मसुरे – मार्गाचीतड यांचे सुश्राव्य भजन बुवा. श्री. अमित बागवे. रात्रौ ९:३० वाजता दुगदिवी पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ, कुणकवळे, मालवण यांचा पौराणिक नाट्यप्रयोग”सिध्दटेकचा सिध्दीविनायक” होणार आहे. उपस्थितीचे आवाहन श्री महागणपती विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.


Spread the love

Related posts

सिंधुदुर्ग जिल्हयातील वानर व माकडे यांची प्रगणना पुर्वतयारी कार्यशाळा.

news

चंद्रयान-३ (Chandrayaan-3) मोहीम यशस्वी होणारच !

news

मालवणातील ‘हा’ मार्ग वाहतुकीसाठी काहीकाळ केला बंद!

news

Leave a Comment