स्टोरी

पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या करूळ गावात शुक्रवारी २४ जानेवारीला होणार कोकण मराठी साहित्य परिषद ची महत्वपूर्ण बैठक

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग ची जिल्हा कार्यकारणी ची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवारी २४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता करूळ ग्रंथालय येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक उपस्थित राहणार आहेत. तसेच कोमसाप च्या अध्यक्ष नमिता कीर, कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ आधी उपस्थित राहणार आहेत. पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या उपस्थितीत हे महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.

या बैठकीत साहित्यिक सांस्कृतिक कार्य या संदर्भात चर्चा तसेच जिल्हा साहित्य संमेलन नियोजन आदींवर चर्चा होणार आहे.. तरी सर्व जिल्हा कार्यकारणी सदस्य यांनी उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हाअध्यक्ष मंगेश मस्के, सचिव विठ्ठल कदम यांनी केले आहे. पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या करूळ या मूळ गावी कित्येक वर्षानंतर बैठक होत आहे. संस्थापक अध्यक्ष श्री कर्णिक सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे या बैठकीला महत्त्व आहे. तरी सर्वांनी उपस्थित रहावे. असे स्पष्ट करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

सावंतवाडी शहरातील रस्त्याच्या दुरावस्थेला नेमकं जबाबदार कोण? “Mngl” कंपनी कि सावंतवाडी नगरपरिषदचे अधिकारी?

प्रसाद परब

मसूरे डांगमोडे येथे अमली पदार्थ मुक्त सिंधुदुर्ग अभियान जनजागृती फेरी!

news

१४ आणि १५ मार्च या दिवशी गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता

news

Leave a Comment