स्टोरी

श्री स्वामी समर्थ सेवामार्गातर्फे श्रीक्षेत्र वेरूळ येथे  २१ जानेवारीला श्री चक्रराज श्रीयंत्र पूजन सोहळा.

Spread the love

नाशिक (प्रतिनिधी): दिंडोरी प्रणित अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गातर्फे राष्ट्रहित आणि जनकल्याणासाठी श्रीक्षेत्र वेरूळ येथे भगवान श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या पावन भूमीवर श्री चक्रराज श्रीयंत्र पूजन आणि अतिरुद्र पठण सेवा आयोजित करण्यात आली आहे.

पौष कृष्ण अष्टमी मंगळवार दि. २१ जानेवारी २०२५ रोजी सकाळी आठ वाजता भूपाळी आरतीनंतर या सेवेला सुरुवात होईल. श्री क्षेत्र वेरूळ (छ.संभाजीनगर) येथील’दिवशी’ या गावी हा ऐतिहासिक आध्यात्मिक सोहळा संपन्न होत आहे. संभाजीनगर येथून कार्यक्रमाचे ठिकाण २४ किलोमीटर अंतरावर आहे. परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या आशीर्वादाने आणि परमपूज्य गुरुमाऊली श्री. अण्णासाहेब मोरे यांच्या पावन सान्निध्यात होणाऱ्या या सर्वोच्च सेवेची अनोखी पर्वणी सेवेकऱ्यांना लाभणार आहे.

कार्यक्रमाच्या दिवशी भूपाळी आरतीनंतर प्रधान संकल्प त्यानंतर श्री अतिरुद्र पठण सेवा आणि श्री चक्रराज श्रीयंत्र पूजनाचा सोहळा होईल. सकाळी साडेदहा वाजता महाआरती झाल्यावर परमपूज्य गुरुमाऊली श्री. अण्णासाहेब मोरे यांचे अमृततुल्य हितगुज आणि त्यानंतर महाप्रसादाचे वाटप होईल. अशी या भव्य दिव्य कार्यक्रमाची रूपरेषा आहे. या कार्यक्रमासंदर्भात तयार करण्यात आलेल्या नियमावलीचे सेवेकर्‍यांनी पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

भगवान श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे अतिप्राचीन असून या ज्योतिर्लिंगाला अंतिम ज्योतिर्लिंग म्हणून संबोधले जाते. भगवान शिवाच्या भूमीवर परमपूज्य गुरुमाऊलींच्या पावन उपस्थितीत ही सेवा होत असल्याने या सर्वोच्च अध्यात्मिक सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. परमपूज्य गुरुमाऊलींनी यापूर्वीही अखिल सेवेकरी परिवाराला सोबत घेऊन विविध तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सत्संग मेळावे आयोजित केले होते. राष्ट्राची सर्वांगीण प्रगती आणि मानवी जीवन सुखी,समाधानी आणि समृद्ध व्हावे याकरिताच सेवामार्गातर्फे बहुविध उपक्रमांचे वेळोवेळी यशस्वी आयोजन केले जाते.


Spread the love

Related posts

राजवाडा येथील वळणावर रस्त्यावर ऑइल पडल्याने तीन दुचाकीना अपघात

news

देवबाग येथील रामचंद्र मधुसूदन सामंत यांच्या घराचे आगीमुळे नुकसान : आमदार वैभव नाईक यांनी केली पाहणी…!

news

काल अहमदाबादमध्ये घडलेली विमान दुर्घटना ही एक ‘अपघात’ नव्हती. ती एक जागृत नरसंहार होती…! डॉ.गौरी साखरे, अमरावती.

news

Leave a Comment