स्टोरी

कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ओरस या संस्थेच्या विश्वस्त पदी मसुरे गावचे डॉक्टर श्रीकृष्ण उर्फ दिपक मुळीक परब…

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: प्राध्यापक सुभाष फाटक चारिटेबल ट्रस्ट संचालित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ओरस या संस्थेच्या विश्वस्त पदी मसुरे गावचे सुपुत्र प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर श्रीकृष्ण उर्फ दीपक मुळीक परब यांची नुकतीच निवड झाली आहे. याबाबतचे लेखी पत्र व्यवस्थापकीय विश्वस्त योगेश तावडे यांनी डॉक्टर दीपक मुळीक परब यांना दिले आहे. उद्योग क्षेत्राबरोबरच डॉक्टर दीपक मुळीक परब यांचे शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान असून मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई या संस्थेचे ते अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. महाराष्ट्रामधील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांचे योगदान बहुमूल्य असं आहे. आपल्या निवडीबद्दल उद्योजक डॉक्टर दीपक मुळीक परब यांनी या संस्थेचे आभार मानले असून येणाऱ्या काळामध्ये या संस्थेचे नाव उज्वल करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू असे बोलताना सांगितले. त्यांच्या या निवडीबद्दल मसुरे मुंबई भागातून अभिनंदन होत आहे.


Spread the love

Related posts

नायजेरियाच्या प्रतिष्ठित रिव्हर्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसाठी अमोल भगत यांची ज्यूरी सदस्य म्हणून निवड.

news

प्रा. राजाराम परब यांना कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलचा ‘शैक्षणिक शिल्पकार’ पुरस्कार प्रदान..!

news

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज B20 शिखर परिषद 2023  ला संबोधित करणार!

news

Leave a Comment