स्टोरी

आर. पी. बागवे स्कूल मसुरे येथे साने गुरुजी कथामालेचा शुभारंभ

Spread the love

मालवण ( मसुरे ): आज शनिवार दिनांक १३ जुलैरोजी आर. पी. बागवे स्कूल मसुरे येथे साने गुरुजी कथामालेचा शुभारंभ करण्यात आला. इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना घेऊन आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत साने गुरुजी कथामालेची शाखा साने गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सुरू करण्यात आली. सुरुवात खरा तो एकची धर्म या प्रार्थनेने झाले यानंतर कथा मालेचा उद्देश, आनंददायी शनिवार मध्ये अभ्यास न करणाऱ्या, अपुरा ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांना सहभाग कसा घेता येणार नाही याची माहिती मुख्याध्यापिका गोदे मॅडम यांनी दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. कोदे मॅडम यांनी आदर्श कथाकथनाचा नमुना कसा असावा याचे प्रात्यक्षिक करून दाखवत बाताराम थापमारे आणिथापाराम थांबरे ही गोष्ट पेश केली. त्यानंतर विद्यार्थ्यांना मुक्तपणे पेटी वादन करण्यास ,शिकण्यास वेळ दिला गेला. एक देशभक्ती पर कन्नड गीत शिकवून व पसायदान म्हणून कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली. यावेळी श्री. पाताडेसर, सौ. भोगले, कु. जाधव मॅडम व विद्यार्थी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

कोकण रेल्वे मध्ये अडकून पडलेल्या सिंधुदुर्गातील प्रवाशांना शिक्षण मंत्री दीपक केसरकरांकडून जेवण आणि पाण्याची व्यवस्था.

news

कलंबिस्त हायस्कूलच्या १९९७-९८ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न…!

news

भारत आखाती देशांशी थेट रेल्वे जाळे निर्माण करण्याच्या प्रयत्नात….

news

Leave a Comment